Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government scheme: आता शिक्षण पूर्ण करण्यात आर्थिक मदत करणार राज्य सरकारची 'ही' योजना..

Student

Government scheme: राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दहावी, बारावी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी 51 हजारांची रक्कम दिली जाणार आहे.

Government scheme: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील एक कुटुंब. ज्यांना 2 अपत्य आहे. मोलमजुरी करून आता पर्यंत कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि दोन्ही मुलांचे दहावी, बारावी पर्यंत शिक्षण पुर्ण केले. पण जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणे आता आपल्याला परवडणार नाही म्हणून दोन्ही मुलींना शिक्षण सोडावे लागणार असा विचार त्यांच्या मनात आला. पण मुलींची शिक्षणाकडे ओढ बघून त्याचं मन मानत नव्हतं. 

त्यांनी गावातील एका उच्च पदावर असलेल्या व्यक्तीसोबत चर्चा केली आणि त्यातुन त्यांना कळले की, महाराष्ट्र स्वाधार योजनेच्या माध्यमातून आपल्या मुली शिक्षण घेऊ शकतात. त्या योजनेबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर वडिलांचा आनंद गगनात सामावत नव्हता. तर तुम्हीही माहित करून घ्या महाराष्ट्र स्वधार योजनेबाबत. 

महाराष्ट्र स्वाधार योजना राज्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे ज्यांना पुढील शिक्षण घ्यायचे आहे, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या पुढील शिक्षणासाठी सक्षम नाही. राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दहावी, बारावी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी 51  हजारांची रक्कम दिली जाणार आहे. 

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 महाराष्ट्र समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना पात्र होऊनही शासकीय वसतिगृहात प्रवेश दिला गेला नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. राज्य सरकारकडून ज्या काही सुविधा दिल्या जात आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या निवास आणि इतर खर्चासाठी दिल्या जात आहेत. 

महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी लागणारी कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • बँक खाते क्रमांक जो आधार कार्डशी जोडलेला आहे.
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ओळखपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र

स्वाधार योजनेंतर्गत प्राप्त होणारा खर्च

बोर्डिंग सुविधा

 28000

निवास सुविधा

 15000

विविध खर्च

 8000

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी

5000

इतर शाखा

 2000

एकूण

 51000

योजनेच्या अटी व पात्रता 

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील उमेदवार असणे आवश्यक. 
  • विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असावे. 
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मागील वर्गात 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  • स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असेल अशा गरीब विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 साठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी? 

bharatratna-babasaheb-ambedkar.jpg
  • तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल. 
  • बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना फॉर्म PDF ची लिंक तुम्हाला होम पेजवर देण्यात आली आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक करा.
  • तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर PDF फॉर्म उघडेल.
  • हा फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर, अर्ज तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाकडे सबमिट करा.

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना फॉर्म प्रिंट 

untitled-design-1-1.jpg