आधार कार्डला पॅन कार्ड लिंक (Aadhar-Pan Card Link) करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे. आता फक्त 5 दिवस उरले आहेत. तुम्ही जर 3 जून पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला पहिल्यापेक्षा अधिक दंड भरावा लागणार आहे. 30 जूनपर्यंत लिंकिंग करणाऱ्यांना 500 रूपये भरावे लागत आहेत. त्यानंतर हा दंड दुप्पट होणार आहे.
30 जूननंतर दंड दुप्पट
इन्कम टॅक्स विभागाने यापूर्वी 31 मार्च, 2022 पर्यंत आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत दिली होती. त्यानंतर ती वाढवून 30 जून अशी करण्यात आली आहे. सरकारने मुदत वाढवताना दंड कायम ठेवला आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर लगेच करून घ्या. अन्यथा दुप्पट दंड भरायची तयारी ठेवा.
मार्च 2023 नंतर पॅनकार्ड ठरणार अवैध
इन्कम टॅक्स कायद्याच्या नियम 234H अनुसार 30 जूननंतर ते 31 मार्च, 2023 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 1हजार रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यानंतरही तुम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर मार्च, 2023 नंतर तुमचे पॅनकार्ड वैध राहणार नाही. म्हणजेच पॅन कार्डशी संबंधित सेवासुविधांचा वापर करता येणार नाही. तसेच अवैध ठरलेल्या पॅनकार्डचा जर तुमच्याकडून वापर केला गेल्याचे लक्षात आल्यास तुमच्याकडून इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 272B अनुसार 10 हजार रूपयांपर्यंत दंड वसूल केला जाऊ शकतो.
आधार कार्ड - पॅनकार्डला असे लिंक करा
- इन्कम टॅक्स वेबसाईटच्या होम पेजवरील क्विक लिंक्स (Quick Links) या टॅबवरील लिंक आधार (Link Aadhar) यावर क्लिक करा.
- Link Aadhar वर क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल.
- इथे तुम्हाला सर्वप्रथम पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, आधार कार्ड जसे नाव आहे तसेच इथेही टाकायचे आहे. आणि शेवटी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे टीकमार्क करून द्यायची आहेत. पहिला प्रश्न आधार कार्डवर फक्त जन्म तारखेचे वर्ष आहे. दुसरा प्रश्न या प्रक्रियेसाठी आधार कार्डवरील माहिती तपासण्यासाठी मी तुम्हाला संमती देत आहे.
- त्यानंतर लिंक आधार या बटनावर क्लिक केले की, तुमची प्रक्रिया पूर्ण होते.
Image Source - https://bit.ly/380YMBj