Digital Policy: विमा पॉलिसी (Insurance policy) पूर्ण होताच, रक्कम मिळवण्यासाठी, विमा घेताना मिळालेली पॉलिसी नोट आणि काही महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. या कागदपत्रांच्याआधारे, विमा कंपनी पॉलिसी डिटेल्स चेक (Check policy details) करून आपली रक्कम आपल्या हातात देते. अनेकांना सवय असते काम झाले की त्या रिसिप्ट फेकून देतात किंवा मग कुठे ठेवली याची आठवण सुद्धा राहत नाही. पण आता 2023 मध्ये विमा कंपन्या असे काहीतरी करणार आहेत, त्यानंतर पॉलिसीची ही कागदपत्रे नेहमी जवळ ठेवण्याची गरज भासणार नाही. तर जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.
IRDA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार…..
नवीन वर्षापासून विमा पॉलिसी घेणे अत्यंत सोपे होणार आहे. खूप वर्षा पूर्वीची पॉलिसी देखील डिजिटल होईल. नवीन पॉलिसी डिजिटल (Digital Policy) पद्धतीने विकत घेणे खूप दिवसांपासून शक्य होते. परंतु 2023 च्या अखेरीस, विमा कंपन्यांना कागदपत्रे असलेल्या सर्व जुन्या विमा उत्पादनांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करणे बंधनकारक असेल. IRDA च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 2023 च्या अखेरीस, सर्व विमा उत्पादने डिजिटल स्वरूपात रूपांतरित केली जातील. यानंतर नवीन किंवा जुन्या सर्व प्रकारच्या विमा पॉलिसी 100 टक्के डिजिटल होतील.
2047 पर्यंत सर्व लोकांना विमा संरक्षण मिळेल.. (All people will get insurance coverage by 2047)
क्लेम निकाली काढण्यासाठी मोठा पुढाकार आता विमा क्लेम निपटारासाठीही मोठा पुढाकार घेतला जात आहे. या अंतर्गत, देशभरात विशेष क्लेम सेंटर स्थापन केले जातील जेणेकरुन लोकांना क्लेम सेटलमेंटमध्ये (Claim Settlement) विलंब किंवा त्रास होऊ नये. आरोग्य विम्याप्रमाणेच इतर विम्याचे क्लेम निकाली काढण्यासाठी सर्व भागात क्लेम सेंटर उघडली जात आहेत.
आरोग्य विम्याचे, जास्तीत जास्त 30 दिवसांच्या आत सर्व विमा क्लेम निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे मोटार वाहनांशी संबंधित विम्याचे क्लेमही 30 दिवसांत निकाली काढले जातील, ज्यासाठी सध्या यापेक्षा जास्त वेळ लागतो. 2047 पर्यंत सर्व लोकांना विमा संरक्षण (Insurance coverage) मिळेल, फक्त क्लेम सेटलमेंटचे काम केले जाईल. क्लेम सेंटर कोविड-19 (Covid-19) नंतर लहान शहरांमध्ये आरोग्य विम्याची वाढती व्याप्ती हे याचे प्रमुख कारण आहे. 2047 पर्यंत सर्व लोकांना विमा संरक्षण देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.