• 05 Jun, 2023 19:55

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rental Agreement : घर भाड्याने घेताना कोणता करार ठरेल फायदेशीर?

Rental Agreement

Notarized Or Registered Rent Agreement : जेव्हा आपण घर भाड्याने घ्यायला जातो, तेव्हा घरमालक आणि भाडेकरू यांच्यात एक करार होत असतो, त्याला भाडे करार असे म्हणतात. या करारानुसार घरमालक स्वत:चे घर दुसऱ्याला ठराविक काळ राहायला देतो. परंतु हा करार करण्याचे दोन मार्ग आहे. त्यापैकी एक म्हणजे नोंदणीकृत भाडे करार आणि दुसरा म्हणजे नोटरीकृत भाडे करार. या दोन्हीपैकी कोणता करार करणे फायदेशीर ठरेल ते पाहूया.

Rent Agreement types: अनेकदा घर भाड्याने दिल्यानंतर भाडेकरूच्या नको त्या कटकटींमुळे घरमालकाच्या नाकीनऊ येते. त्यामुळे घर भाड्याने देण्यापूर्वी मालक सावधगिरीचा पवित्रा घेताना दिसतात. भविष्यात कुठल्याही कायदेविषयक अडचणी येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन देखील खबरदारी म्हणून घरमालकाला भाडे करार करून घ्यायचा सल्ला देतात. जर भाडेकरू 11 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहणार असेल, तर भाडेकरार नोंदणीकृत किंवा नोटरीकृत करणे अनिवार्य असते.

भाडे करार महत्त्वाचा का?

घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील भविष्यातील वाद टाळण्यासाठी भाडेकरार एक महत्त्वाचा करार ठरतो. हा करार दोन्ही पक्षांच्या संमतीने केला जातो. करार करताना त्यामध्ये लिहिलेल्या अटी आणि शर्ती दोन्ही पक्षांनी मान्य केल्यानंतर परस्पर संमतीशिवाय बदल करता येत नाही. 

नोंदणीकृत भाडे करार

नोंदणीकृत भाडे करार हा लेखी असतो. मात्र हाच करार जर का लिखित असला, आणि भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्यास हा करार पुरावा म्हणून काम करेल. नोंदणीकृत भाडे करार हा स्टॅम्प पेपरवर प्रिंट केलेला असतो. तसेच क्षेत्रीय उपनिबंधकाकडे त्याची नोंदणी असते. काही ठिकाणी या कागदपत्रांच्या ऑनलाइन नोंदणीची सुविधा आहे. भाडे करार नोंदणीकृत करण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तो एक कायदेशीर पुरावा असतो आणि भविष्यात कोणत्याही कायदेशीर विवादांपासून घरमालकाचे संरक्षण होते. घर भाडे करार  नोंदणीकृत केल्यास भाडे नियंत्रण कायद्यातील तरतुदी लागू होतात.

नोटरीकृत भाडे करार

नोटरीकृत करार हा सार्वजनिक नोटरीद्वारे स्वाक्षरी केलेल्या स्टॅम्प पेपरवर प्रिंट केलेला भाडे करार असतो. भारतात सार्वजनिक नोटरी करण्यास प्रामुख्याने वकील असतो. नोटरीकृत कराराच्या बाबतीत नोटरी दोन्ही पक्षांची ओळख आणि कागदपत्रे प्रमाणित करतो. तर या प्रक्रियेसाठी दोन्ही पक्षांना (मालक आणि भाडेकरू) नोटरीसमोर हजर राहावे लागते. नोंदणीकृत करारापेक्षा नोटरीकृत करार खूपच सोपा असतो. कारण तो फक्त वकिलाच्या कार्यालयात जाऊन करता येतो आणि त्यासाठी कोणतेही मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी शुल्क भरावे लागत नाही. फक्त वकीलाचे फी द्यावी लागते. मात्र हा करारनामा न्यायालयात (कायदेशीरपणे) स्वीकार्य नाही.