Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hyundai Creta ची नवीन सिरिज डायनॅमिक लूक आणि भन्नाट Security फीचर्ससह झाली लॉंच, जाणून घ्या किंमत

Hyundai Creta

Image Source : http://www.carwale.com/

Hyundai Creta Dynamic Black Edition: Hyundai Creta ची नवीन सिरिज डायनॅमिक लूक आणि भन्नाट Security फीचर्ससह लॉंच झाली आहे, जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती.

Hyundai Creta Dynamic Black Edition: साऊथ कोरियन कार उत्पादक कंपनी Hyundai ने त्यांच्या प्रसिद्ध SUV Creta चे नवीन डायनॅमिक ब्लॅक एडिशन लाँच केले आहे. आकर्षक लुक आणि मजबूत इंजिन पॉवरने सज्ज असलेली एसयूव्ही पूर्णपणे डायनॅमिक ब्लॅक थीमवर तयार करण्यात आली आहे. कंपनीने ही SUV इंडोनेशियन मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे ही डायनॅमिक ब्लॅक एडिशन क्रेटाच्या फेसलिफ्टेड मॉडेलवर आधारित आहे, जी अजून भारतीय बाजारपेठेत लॉंच झालेली नाही. 

indonesian-version-of-creta.jpg
http://www.carwale.com/

Hyundai Creta डायनॅमिक ब्लॅक एडिशन (Hyundai Creta Dynamic Black Edition)

Hyundai ने Hyundai Creta चे सेकंड जनरेशन मॉडेल मार्च 2020 मध्ये लॉन्च केले होते. आता तिच्या फेसलिफ्ट मॉडेलची वाट पाहत आहे, कंपनी सध्या नवीन emissions  नियमांनुसार RDE इंजिनसह भारतीय बाजारपेठेतील वाहनांची कॅटेगरी अपडेट करण्यात व्यस्त आहे. नवीन क्रेटा ब्लॅक एडिशनबद्दल बोलताना, कंपनीने त्याच्या बाह्य आणि आतील भागात अनेक बदल केले असल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे ते नियमित मॉडेलपेक्षा वेगळे आहे. 

Hyundai Creta Dynamic Black Edition ही भारतीय बाजारात विकल्या जाणार्‍या नाईट एडिशनसारखीच आहे. जरी इंडोनेशियन व्हेरियंट फेसलिफ्ट केलेल्या मॉडेलवर आधारित असले तरी ते अधिक आकर्षक आणि फ्रेश दिसते. डायनॅमिक ब्लॅक एडिशनच्या फ्रंटला LED डेटाइम रनिंग लाइट्स (DRL's) सह Hyundai ची नवीन पॅरामेट्रिक ग्रिल मिळणार आहे. या एसयूव्हीचा फ्रंट कंपनीच्या प्रसिद्ध SUV Tucson सारखा आहे.

SUV च्या आत, केबिनला ऑल ब्लॅक थीमने सजवण्यात आले आहे, सर्व ब्लॅक डॅशबोर्डने त्याला प्रीमियम लुक दिला आहे. इंडोनेशियन-स्पेक क्रेटाला फक्त आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे, तर भारतात 10.25-इंच टचस्क्रीन युनिट मिळते. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, क्रेटा डायनॅमिक ब्लॅक एडिशनला लेदरेट सीट अपहोल्स्ट्री, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आणि बरेच काही मिळते. 

exterior-of-the-car-is-de-chromed-and-complements-the-overall-black-aesthetic-of-the-suv.jpg
http://www.carwale.com/

पॉवर आणि Security फीचर्स (Power and Security Features)

या SUV मध्ये देखील कंपनीने 1.5-लीटर पेट्रोल इंजिन वापरले आहे जे 113bhp पॉवर आणि 144Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल आणि कंटिन्युअसली व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT) गिअरबॉक्स देण्यात आला आहे. Hyundai Creta च्या या विशेष सिरिजमध्ये कंपनीने सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेतली आहे. Hyundai Smart Sense ने सुसज्ज असलेल्या या SUV मध्ये Advanced Driving Assistance System (ADAS) सिस्टिम देण्यात आली आहे. याला फॉरवर्ड कोलिशन अव्हायडन्स असिस्ट मिळतो, हे फीचर समोरासमोर टक्कर होण्यापासून सुरक्षित करते. 

याशिवाय लेन फॉलोइंग असिस्ट, लेन कीप असिस्ट, ब्लाइंड स्पॉट अलर्ट, रिअर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट यासारख्या वैशिष्ट्यांमुळे ते आणखी चांगले बनते. अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), वाहन Stability Management (VSM), इलेक्ट्रॉनिक stability control (ESC), हिल असिस्ट कंट्रोल (HAC) इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स Distribution (EBD) सारखे फीचर्स आहे. 

dashboard-is-finished-in-black-theme.jpg
http://www.carwale.com/

Hyundai Creta ची किंमत (Hyundai Creta Price)

इंडोनेशियन बाजारात, Hyundai Creta च्या या नवीन डायनॅमिक ब्लॅक एडिशनची किंमत 35 कोटी (Indonesian Rupee) असेल, जी भारतीय चलनानुसार ट्रान्सफर केल्यास सुमारे 19 लाख रुपये असू शकते. सध्या Hyundai ने क्रेटा फेसलिफ्ट भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु अशी अपेक्षा आहे की यावर्षी क्रेटा फेसलिफ्ट येथील बाजारपेठेत लॉन्च केली जाऊ शकते.