Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC new policy: एलआयसीनं आणली नवी विमा पॉलिसी, 'धनवृद्धी'सह कर सवलतीचाही मिळणार लाभ

LIC new policy: एलआयसीनं आणली नवी विमा पॉलिसी, 'धनवृद्धी'सह कर सवलतीचाही मिळणार लाभ

Image Source : www.twitter.com

LIC new policy: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसीनं एक नवी विमा पॉलिसी आणली आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून तुमच्या पैशांची बचत तर होणार आहेच मात्र त्यासोबतच विविध लाभदेखील मिळणार आहेत. त्याच महत्त्वाचं म्हणजे कर सवलतीचा लाभ. कशी आहे ही नवी विमा पॉलिसी? जाणून घेऊ...

एलआयसीनं (Life Insurance Corporation) आणलेल्या या नव्या विमा पॉलिसीचं नाव आहे एलआयसी धन वृद्धी (LIC Dhan Vriddhi). ही एक नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्युअल सेव्हिंग स्कीम (Non participating individual saving scheme) आहे. ही योजना मोठ बदल घडवून आणेल, अशी एलआयसीला आशा आहे.

सुरक्षा, विकास आणि आर्थिक स्थिरता

देशांतर्गत बाजारातल्या विमा गरजा पूर्ण करणं हे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या धन वृद्धी या नव्या योजनेचं उद्दिष्ट आहे. यासोबतच विमाधारकाला आर्थिक सुरक्षा देणंही गरजेचं आहे. या योजनेअंतर्गत विमाधारकाला सर्वसमावेशक जीवन विमा मिळणार आहे. सुरक्षा, विकास आणि आर्थिक स्थिरता हे प्रमुख मुद्दे यात विचारात घेण्यात आलेले आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळाअंतर्गत सुरू करण्यात आलेली ही विमा योजना विमाधारकाच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असणार आहे.

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी...

एलआयसीनं ही योजना 23 जून 2023मध्ये सुरू केली आहे. आपल्या ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते नियम मजबूत करत असल्याचं एलआयसीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ही योजना विमाधारकाच्या सर्व गरजा पूर्ण करेल आणि ग्राहकांच्या समस्याही दूर करेल.

एलआयसी धन वृद्धी योजनेची वैशिष्ट्ये

ही विमा पॉलिसी जीवन विमा सिंगल-प्रिमियम पॉलिसी आहे. याद्वारे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान बचत आणि संरक्षण यांचं योग्य संयोजन मिळतं. लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, ही पॉलिसी 1,000 रुपयांच्या विमा रकमेवर 75 रुपयांपर्यंत अतिरिक्त हमी प्रदान करते. कर सवलतीचाही लाभ असेल. पॉलिसीधारक कलम 80-सी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र असणार आहे. म्हणजेच ही पॉलिसी खरेदी करणाऱ्या विमाधारकांना दीड लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. पॉलिसीधारक पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कधीही सरेंडर करू शकतो, हेदेखील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य या पॉलिसीत पाहायला मिळतं.

आघाडीची सरकारी कंपनी

भारतीय आयुर्विमा महामंडळ ही भारतातील एक आघाडीची सरकारच्या अखत्यारीत असलेली विमा कंपनी आहे. एलआयसीकडून विविध वयोगटासाठी, विविध श्रेणीसाठी विमा पॉलिसी प्रदान करण्यात येते. यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांसाठीच्या विविध विमा योजना आहेत. मुलींच्या लग्नासाठीही या सरकारी कंपनीनं योजना आणल्या आहेत. त्याचबरोबर बाजारपेठ आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नवीन धोरणंदेखील आणली जात आहेत.

सर्वसामान्यांचा विश्वास

एलआयसीनं सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. सध्या बाजारात विविध खासगी विमा कंपन्यांकडून विमा पॉलिसी दिली जाते. मात्र सर्वसामान्यांकडून एलआयसीला प्राधान्य दिलं जातं. विविध आर्थिक स्तरासाठीचे विविध प्लॅन्स एलआयसीमध्ये असल्यानं एक सुटसुटीत व्यवस्था एलआयसी प्रदान करते. वेळोवेळी विविध योजना आणल्या जातात. आता धनवृद्धी हीदेखील त्याच प्रकारातली नवी योजना आहे. यालादेखील सर्वसामान्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा एलआयसीला आहे.