Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Car launches before 2022: वर्षअखेर 'या' कंपन्यांच्या कार लाँच होतील

New Car launches before 2022

बीएमडब्ल्यू, टोयोटा, एमजीहेक्टर कंपनीने नवीन मॉडेल्स वर्ष संपताना लाँच केली आहेत. बीएमडब्ल्यू कंपनीच्या दोन तर एमजी हेक्टर, टोयोटा कंपनीची प्रत्येकी 1 कार शेवटच्या महिन्यात लाँच होत आहेत.

बीएमडब्ल्यू, टोयोटा, एमजीहेक्टर कंपनीने नवीन मॉडेल्स वर्ष संपताना लाँच केली आहेत. बीएमडब्ल्यू कंपनीच्या दोन तर एमजी हेक्टर, टोयोटा कंपनीची प्रत्येकी 1 कार शेवटच्या महिन्यात लाँच होत आहेत. वर्ष अखेरीस कार निर्मिती कंपन्यांकडून कार्सवर भरघोस सूट देण्यात येते. तसेच जुना स्टॉक संपवण्यासाठीही कंपन्या प्रयत्न करत असतात. या नवीन कार्समध्ये कोणकोणती फिचर्स असतील याबाबत माहिती आपण घेणार आहोत.

बीएमडब्ल्यू एक्सएम (BMW XM)

bmw-xm.jpg

बीएमडब्ल्यू एक्सएम ही कार डिसेंबर मध्ये लाँच करण्यात आली आहे. ही एक हाय परफॉर्मन्स एसयूव्ही कार आहे. या कारची डिजाइन इतर बीएमडब्ल्यू कारपेक्षा अत्यंत वेगळी आहे. या कारमध्ये प्लगइन इलेक्ट्रिक व्हेइकल इंजिन असणार आहे. ही कार ४.३ सेकंदात १०० किलोमीटरचा पल्ला गाठण्याची क्षमता आहे. तसेच या कारचे इंडिरिअरही अत्यंत वेगळे आहे. आधीच्या बीएमडब्ल्यू कारपेक्षा या कारचे डिझाइनही वेगळे आहे. इलेक्ट्रिक आणि पेट्रोल व्हेरियंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारची किंमत दोन कोटींच्या पुढे सुरू होते.

बीएमडब्ल्यू एक्ससेव्हन (BMW X7)

bmw-x7.jpg

X7 भारतामध्ये xDrive 40i आणि xDrive 30D या श्रेणींमध्ये उपलब्ध असेल. या कारचे हेडलाइट डिझाइन पूर्णपणे नव्याने डिझाइन केलेले आहे. तसेच कारमधील इंटिरिअरही नव्यानेच डिझाइन केलेले आहे. डीएमडब्ल्यूच्या आधीच्या iX आणि i4 कारमध्ये उपलब्ध असलेली इन्फोटेंन्मेन्ट स्क्रीन आता X7 मॉडेलमध्येही उपलब्ध झाली आहे. 48V क्षमतेचे माइल्ड हायब्रीड तंत्रज्ञान असलेले इंजिन या कारमध्ये असेल. या कारची किंमत 1 कोटीच्या पुढे सरू होते.

Toyota Hyryder CNG

toyota-hyryder-cng.jpg

टोयोटा हायरायडर कारमध्ये अनेक नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत. ही कार दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असणार आहे. या कारमध्ये ७ इंची टचस्क्रीन देण्यात आला आहे. ऑटो फोल्डेबल मिरर, अॅम्बियंट लाइटिंग, रेअर वायपर, पार्किंग कॅमेरा, अॅलेक्सा आणि गुगल असिस्टंट, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोलही देण्यात आले आहे. या कारची किंमत १५ लाखांच्या पुढे सुरू होते.

एमजी हेक्टर (MG Hector)

mg-hector.jpg

एमजी कंपनीने नुकतेच हेक्टर ब्रँडची कार बाजारात आणली. या कारच्या पुढीला भागामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पुढील बाजूस मोठ्या आकाराचे डायमंड ग्रील आणि त्याच्या बाजूने 2 बॅरल हेडलाइट आणि एलईडी डीआरल बसवण्यात आल्या आहेत. सोबतच कारमध्ये ADAS सेन्सरही देण्यात आले आहे. ही कार डिसेंबर महिन्यात लाँन्च होणार आहे. या कारची किंमत 15 लाखांच्या पुढे सुरू होते.