Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Direct Tax Collection: गेल्या तीन महिन्यात 3,79,760 कोटी कर संकलन, Income Tax विभागाची माहिती

Direct Tax Collection

2023-24 या आर्थिक वर्षासाठी कर भरण्याची मोहीम सुरु झाली आहे. यात 1 एप्रिल ते 17 जून दरम्यान प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collection) मोठी वाढ नोंदवली गेली आहे. वित्त मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.18 टक्क्यांनी वाढले आहे

सध्या आयकर विभागाची कर संकलनाची मोहीम जोरात सुरु आहे. तुम्ही देखील तुमचा गेल्या आर्थिक वर्षातील कर भरला की नाही? जर अजूनही भरला नसेल तर लवकरात लवकर कर भरणा करा नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल. हे काम तुम्ही लवकरच पूर्ण कराल याची आम्हालाही खात्री आहे, चला तर जाणून घेऊयात की आतापर्यंत देशभरातील करदात्यांनी किती रुपयांचा कर जमा केलाय.

2023-24 या आर्थिक वर्षासाठी कर भरण्याची मोहीम सुरु झाली आहे. यात 1 एप्रिल ते 17 जून दरम्यान प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collection) मोठी वाढ नोंदवली गेली आहे. वित्त मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.18 टक्क्यांनी वाढले आहे. 1 एप्रिल ते 17 जून दरम्यान तब्बल 3,79,760 कोटी रुपयांची रक्कम कर स्वरूपात कर विभागाला प्राप्त झाली आहे. सोपी कर रचना, कर भरण्यासाठी तयार केलेले सोपे पोर्टल या सगळ्यांचा हा एकत्रित परिणाम असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

ल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत प्रत्यक्ष कर संकलन 3,41,568 कोटी रुपये इतके नोंदवले गेले होते. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, 3,79,760 कोटी रुपयांच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 1,56,949 कोटी रुपयांचा कॉर्पोरेशन टॅक्स (Corporate Income Tax), सुरक्षा व्यवहार (Securities Transaction Tax) 2,22,196 कोटी रुपयांसह वैयक्तिक आयकर (Personal Income Tax) समाविष्ट आहे.

ऑनलाईन कर कसा भराल?

एक गोष्ट लक्षात असू द्या, जमा झालेला सगळा पैसा हा सरकारचा आहे असे समजण्याचे कारण नाही. कारण यातून नियमित करदात्यांना आवश्यक तितका कर परतावा (Income Tax Return) देखील दिला जाणार आहे. त्यामुळे जमा झालेला करातून वजा केलेल्या कर परतावा रकमेनंतर शिल्लक राहिलेली रक्कम ही सरकारची कमाई असते.

तेव्हा तुम्ही देखील वेळ न दवडता लवकरात लवकर कर भरा, तेही घरबसल्या. जाणून घ्या कसा भराल ऑनलाईन कर ?

स्टेप 1: ऑनलाइन कर भरण्यासाठी, https://www.protean-tinpan.com/ > Service > e-Payment येथे लॉग इन करा: ‘Pay Tax Online’ या टॅबवर क्लिक करा.

स्टेप 2: संबंधित चलन म्हणजे ITNS 280, ITNS 281, ITNS 282, ITNS 283, ITNS 284 किंवा फॉर्म 26 QB डिमांड पेमेंट (केवळ मालमत्तेच्या विक्रीवर TDS साठी) लागू आहे म्हणून निवडा.

स्टेप 3: PAN / TAN (लागू असल्यास) आणि इतर अनिवार्य चलन तपशील जसे की, करदात्याचा पत्ता आणि ज्या बँकेद्वारे पेमेंट करायचे आहे त्याचे नाव इत्यादी माहिती भरा.

स्टेप 4: तुम्ही टाईप केलेला डेटा सबमिट केल्यावर, एक स्क्रीन ओपन होईल, सगळे डीटेल्स जर बरोबर असतील तर करदात्याचे पूर्ण नाव स्क्रीनवर दिसेल.

स्टेप 5: अशा प्रकारे तुमच्या डीटेल्सची माहिती कर खात्याकडे जमा झाल्यानंतर, करदात्याला बँकेच्या नेट-बँकिंग साइटवर निर्देशित केले जाईल.

स्टेप 6: करदात्याला नेट-बँकिंगसाठी त्याच्या बँकेने दिलेले आयडी / पासवर्ड वापरून पेमेंट भरायचे आहे.

स्टेप 7: यशस्वी पेमेंट केल्यावर CIN (Challan Identification Number), पेमेंट तपशील आणि ज्या बँकेद्वारे ई-पेमेंट केले गेले आहे त्या बँकेचे नाव असलेले चलन काउंटरफॉइल प्रदर्शित केले जाईल. ही काउंटरफॉइल तुम्ही कर पेमेंट केल्याचा पुरावा आहे. अशाप्रकारे घरबसल्या तुम्ही तुमचा कर भरू शकता.