Who is Satyadeep Mishra: बाॅलिवुडची अभिनेत्री नीना गुप्ता (Nina Gupta) यांची मुलगी मसाबा गुप्ता हिने बाॅयफ्रेंड सत्यदीप मिश्रा (Satyadeep Mishra) सोबत जीवनाची नवीन सुरूवात केली आहे. हे दोघेही अधिक काळ रिलेशनशीपमध्ये होते. या दोघांचा ही हा दुसरा विवाह आहे. सत्यदीप मिश्रा हे अभिनेत्री अदितीराव हैदर हिचे पहिले पती होते. सत्यदीप मिश्रा कोण आहेत व त्यांच्या संपत्तीविषयी पाहुयात.
सत्यदीप मिश्रा कोण आहे? (Who is Satyadeep Mishra)
सत्यदीप मिश्रा हे एक अभिनेता आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात ‘नो किल्ड जेसिका’ या चित्रपटाने केली होती. नुकताच प्रदर्शित झालेल्या विक्रम वेधा या चित्रपटातदेखील ते पाहायला मिळाले होते. त्याचे संपूर्ण शिक्षण हे देहारादून येथून झाले आहे. त्यांनी वकीलीमध्ये पदवी संपादन केली आहे. यापूर्वी त्यांनी एक सिविल सर्वेंट व वकील म्हणून काम केले आहे.
सत्यदीप मिश्रा यांची संपत्ती (Property of Satyadeep Mishra)
मीडिया रिपोर्टनुसार, 2023 पर्यंत मसाबा गुप्ता यांचे पती संदीप मिश्रा यांच्याजवळ एकूण संपत्ती ही 5 ते 6 करोड आहे. त्यांच्या संपत्तीत अधिक रक्कम ही माॅडेलिंग व अभिनयाच्या माध्यमातून येते. तसेच एअरटेल (Airtel), अजिओ (Ajio), माझा (Maza), एल ओरियल (L’Oreal) सारख्या मोठया कंपनीतदेखील त्यांचे योगदान आहे. तसेच ते सोशलमिडीयावर अधिक वेळ सक्रिय असतात. ते एक सोशल मिडीया इन्फ्लुएंसरदेखील आहेत. त्यांचे सोशल मिडीयावर अधिक फाॅलोवर्स आहेत. या एका माध्यमातूनदेखील ते अधिक कमाई करतात.
नीना गुप्ता यांची संपत्ती (Property of Neena Gupta)
मीडिया रिपोर्टनुसार, नीना गुप्ता यांची एकूण संपत्ती 22 करोड रूपये इतकी आहे. नीना गुप्ता यांना 'चोली के पीछे क्या है’ या गाण्यातून तुफान प्रसिध्दी मिळाली होती. यानंतर त्या अनेक चित्रपटात झळकल्या होत्या. जसे की, त्रिकाल, दो यारों आणि मंडी इ. तसेच त्यांनी वेब सीरीजमध्येदेखील काम केले आहे. वेब सरीज ‘पंचायत 2’ (Panchayat 2) मधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अधिक पसंद केले होते.