• 26 Mar, 2023 15:28

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Bond Cash Before Maturity : मॅच्युरिटीपूर्वी गोल्ड बॉण्डचे पैसे हवे आहेत? या दिवशी करा विड्रॉवल

Gold Bond Cash Before Maturity

Image Source : www.investment.rblbank.com

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI – Reserve Bank of India) ने सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स (SGB) चे अनेक हप्ते मुदतीपूर्वी काढण्यासाठी तारखा निश्चित केल्या आहेत. एक प्रेस रिलीज जारी करून, आरबीआयने 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी अर्ज करण्याच्या वेळेची माहिती दिली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI – Reserve Bank of India) ने सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स (SGB) चे अनेक हप्ते मुदतीपूर्वी काढण्यासाठी तारखा निश्चित केल्या आहेत. एक प्रेस रिलीज जारी करून, आरबीआयने 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी अर्ज करण्याच्या वेळेची माहिती दिली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स हे सरकारी सिक्यूरिटीज आहेत, ज्यांचे मूल्य सोन्याच्या ग्रॅममध्ये आहे. फिजिकल गोल्डऐवजी हे अशाप्रकारे सोने वापरले जाऊ शकते.

28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस रिलीजनुसार, प्रीमॅच्युअर रिडम्पशनसाठी देय हप्त्यांच्या तपशीलासोबत 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 च्या दरम्यान येणाऱ्या हप्त्यांसाठी प्रीमॅच्युअल विड्रॉवलच्या तपशिलासोबत गुंतवणूकदारांद्वारे प्रीमॅच्युअर रिडेम्पशनच्या रिक्वेस्टच्या सब्मिशनसाठी टाईम विंडोसुद्धा नमूद करण्यात आली आहे.

तुम्ही 29 एप्रिल 2023 ते 20 मे 2023 या कालावधीत 2015-I गोल्ड बाँड सिरीजसाठी मुदतपूर्व पैसे काढण्याची विनंती सबमिट करू शकता. तर, 2016-I सिरीजसाठी, 7 जुलै 2023 ते 28 जुलै 2023 या कालावधीत अर्ज करता येतील. याशिवाय 2016-II साठी अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2023 ते 20 सप्टेंबर 2023 पर्यंत वेळ देण्यात आली आहे. दुसरीकडे, 2016-17 सिरीज I साठी विंडो 5 जुलै 2023 ते 25 जुलै 2023 आहे.

याशिवाय, तुम्ही 30 ऑगस्ट 2023 ते 20 सप्टेंबर 2023 या कालावधीत 2016-17 सिरीज II साठी प्रीमॅच्युअर विड्रॉवलची विनंती करू शकता. 2016-17 सिरीज III साठी प्रीमॅच्युअर विड्रॉवलचा कालावधी 17 एप्रिल 2023 ते 8 मे 2023 आहे. 2016-17 सिरीज IV साठी विंडो 17 ऑगस्ट 2023 ते 7 सप्टेंबर 2023 आहे.

प्रीमॅच्युअर विड्रॉवलचे नियम

आरबीआयने पुढे सांगितले की, सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या रिडम्पशनची किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या क्लोजींग प्राईजच्या सिंपल सरासरीवर आधारित असेल. हे सोमवार ते शुक्रवार साठी इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) ने केलेल्या प्रकाशनानुसार असेल. प्रेस रीलिझमध्ये असे म्हटले आहे की त्यानुसार, 4 फेब्रुवारी 2023 रोजी प्रीमॅच्युअर विड्रॉवलच्या रिडम्पशनची किंमत 5717 रुपये असेल. सॉवरेन गोल्ड बॉन्डची प्रति युनिट ही किंमत 23 ते 27 जानेवारी 2023 या आठवड्यातील सोन्याच्या क्लोज प्राईजच्या सिंपल सरासरीवर आधारित असेल.

बाँडवरील व्याज दर वार्षिक 2.50 टक्के निश्चित करण्यात आला आहे. सॉवरेन गोल्ड बाँड्सवर मिळणारे व्याज हे गुंतवणूकदाराला लागू असलेल्या कर कंसानुसार करपात्र आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत  कोणताही टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स किंवा टीडीएस होत नाही हे लक्षात ठेवा.

Source: https://bit.ly/3me6wa7