• 06 Jun, 2023 17:55

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Natural toothpastes sales: कोविडनंतर नॅचरल टूथपेस्टची मागणी घटली; 'ओरल हायजिन' बाबत भारतीयांच्या सवयी काय?

Natural toothpastes sales

कोरोना काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिक आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादनांकडे वळले होते. मात्र, आता नॅचरल टूथपेस्टची विक्री रोडवलीय. ओरल हायजिनसंबंधित उत्पादनांच्या वापरात भारतीय अद्याप मागेच आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात कंपन्यांना मोठी संधी दिसत आहे.

Natural toothpastes sales: आपके टूथपेस्ट में नमक, निंबू, लवंग, चारकोल और क्या क्या है? अशा जाहिराती तुम्ही टीव्हीवर मागील काही वर्षात अनेकवेळा पाहिल्या असतील. रासायनिक पदार्थ शरीरास घातक असल्याचे म्हणत टूथपेस्ट उत्पादक कंपन्यांकडून नैसर्गिक पदार्थांना पुढे आणण्यात आले. ग्राहकही या नव्या उत्पादनांकडे आकर्षित झाले. मात्र, आता या नॅचरल टूथपेस्टची बाजारातील मागणी घटली आहे. पतंजली आणि इतरही आयुर्वेदिक ब्रँडची कोरोनाकाळात विक्री वाढली होती.

कोरोना काळात नैसर्गिक आयुर्वेदिक टूथपेस्टला डिमांड

कोरोना काळात या उत्पादनांच्या विक्रीने उच्चांक गाठला होता. मात्र, आता नॅचरल टूथपेस्टची विक्री घटल्याचे कोलगेट कंपनीने म्हटले आहे. सोबतच भारतीय ग्राहकांच्या 'ओरल हायजिन' म्हणजे मुख स्वच्छतेच्या सवयींवरही प्रकाश टाकला आहे.

2016 ते 2019 या काळात नॅचरल टूथपेस्टची विक्री 900 बेसिस पॉइंटने वाढली होती. कोरोना काळात त्यात आणखी वाढ झाली. मात्र, मागील दोन वर्षांपासून पुन्हा नैसर्गिक टूथपेस्टची विक्री रोडावली असल्याचे कोलगेट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभा नरसिंम्हा यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोलगेट कंपनीच्या नैसर्गिक उत्पादनांची विक्री वाढत असल्याचे त्यांची नमूद केले.

बलाढ्य कंपन्यांची जाहिरातबाजी

टूथपेस्ट विक्रीमध्ये कोलगेट कंपनीचा भारतीय बाजारातील वाटा सुमारे 50% आहे. बाबा रामदेव यांच्याकडून पतंजली उत्पादनांची जोरदार जाहिरात करण्यात आल्यामुळे कोलगेटचा मार्केट शेअर काही प्रमाणात खाली आला आहे. त्यानंतर सर्वच कंपन्यांनी जाहिरात करताना आयुर्वेदिक गुणधर्मांची जाहिरात केली. विरोधाभास म्हणजे ऐकेकाळी परदेशी बलाढ्य कंपन्यांनी हीच नैसर्गिक आयुर्वेदिक उत्पादने नाकारली होती. मात्र, पतंजलीसारख्या कंपन्यांनी आयुर्वेदावर भर दिल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनीही आयुर्वेदिक उत्पादनांना महत्त्व दिले. 

भारतामध्ये मुख (तोंड) स्वच्छता राखण्याचे प्रमाण किती?

तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी टूथपेस्ट, माऊथ क्लिनर, फ्लास्क, मिंट, टंग क्लिनर यासह अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, भारतीय नागरिक या वस्तू वापरण्यात अद्यापही पिछाडीवर आहेत. फिलिपाइन्स, ब्राझील या विकसनशील देशांत भारतापेक्षा जास्त ओरल हायजिन उत्पादने वापरली जातात.

ग्रामीण भागातील परिस्थिती काय?

ग्रामीण भागात निम्म्यापेक्षा जास्त नागरिक दररोज ब्रश करत नाहीत. (Oral hygiene habit of Indians) तर शहरांमध्ये 20% नागरिक दिवसातून फक्त एकदाच ब्रश करतात. त्यामुळे कंपन्यांना अद्यापही बाजारात मोठी पोकळी दिसत आहे.

ग्रामीण भागातील 55% नागरिक दररोज ब्रश करत नाहीत. त्यांना रोज ब्रश करण्याची सवय लागावी. तसेच शहरी भागातील नागरिकांना दिवसातून दोनवेळा ब्रश करण्याची सवय लागावी यासाठी आम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, हे काम सोपे नाही. मंदीसदृश्य परिस्थिती असतानाही मागील तिमाहीत कंपनीला सर्वाधिक नफा मिळाला, असे नरसिम्हा यांनी म्हटले.