Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nifty 20K Journey: 'निफ्टी 50' ची 27 वर्षांतील नॉनस्टॉप घोडदौड, चढ उतारांवर मात करत 20 हजारांचे शिखर सर

Nifty 50

Image Source : www.en.wikipedia.org/wiki/NIFTY_50

Nifty 20K Journey: राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक म्हणून निफ्टी 50 ओळखला जातो. 1996 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 50 मध्ये ट्रेडिंग सुरु झाले. वर्ष 2008 मधील जागतिक महामंदीनंतर 14 वर्षात निफ्टी इंडेक्सने अनेक चढ उतार अनुभवले. वर्ष 1996 मध्ये सुरु झालेला निफ्टीचा प्रवास 27 वर्षात 20 हजार अंकांपर्यंत पोहोचला आहे.

भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी घोडदौड कायम ठेवली आहे. सोमवारी 11 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक प्रथमच 20 हजार अंकांचे शिखर सर केला. 14 वर्षांत निफ्टीने 20 हजार अंकांपलिकडे झेप घेतली. या तेजोमय कामगिरीने गुंतवणूकदार कोट्यधीश झाले.

एकीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला असला तरी सेन्सेक्स आणि निफ्टीची आगेकूच सुरु आहेत. जुलै महिन्यात निफ्टी 20 हजार अंकासमीप पोहोचला होता. तेव्हापासून गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. निफ्टीने सोमवारी 20 हजार अंकांना स्पर्श केला. दिवसअखेर तो 19996.35 अंकांवर स्थिरावला होता.  

राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक म्हणून निफ्टी 50 ओळखला जातो. 1996 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 50 मध्ये ट्रेडिंग सुरु झाले. वर्ष 2008 मधील जागतिक महामंदीनंतर 14 वर्षात निफ्टी इंडेक्सने अनेक चढ उतार अनुभवले. वर्ष 1996 मध्ये सुरु झालेला निफ्टीचा प्रवास 27 वर्षात 20 हजार अंकांपर्यंत पोहोचला आहे.

गुंतवणूकदारांना सातत्यपूर्ण रिटर्न देणारा इंडेक्स म्हणून निफ्टी 50 ने आपली ओळख तयार केली आहे. मात्र या प्रवासात निफ्टी 50 ला काही कटु अनुभव सुद्धा आले. वर्ष 2012 मध्ये निफ्टीमध्ये झालेल्या क्रॅशने गुंतवणूकदारांना जबर हादरा बसला होता. तांत्रिक दोषामुळे निफ्टी 50 निर्देशांकात सकाळच्या सत्रात तब्बल 15.5% घसरण झाली होती. तांत्रिक दोषामुळे हा घोळ झाल्याने एनएसईने मान्य केले. त्या दिवशी निफ्टी दुपारच्या सत्रात काहीसा सावरला होता. अखेर तो 41 अंकांच्या घसरणीसह 5747 अंकांवर बंद झाला होता.

24 ऑगस्ट 2015 मध्ये निफ्टीने पुन्हा एकदा मोठी घसरण अनुभवली. चीनमध्ये मंदीचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला. मंदीचा प्रभाव कमी करण्यासाठी चीनने त्यावेळी स्थानिक चलन युआनचे अवमूल्यन केले होते. याशिवाय भारतीय कंपन्यांची कामगिरी निराशाजनक ठरली.  त्याची झळ भारताला बसली. निफ्टी 490 अंकांच्या पडझडीसह 7809 अंकांवर स्थिरावला होता.

देशातील काळा पैसा नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदीची घोषणा केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 9 नोव्हेंबर 2016 रोजी शेअर निर्देशांक कोसळले. निफ्टी 541 अंकांच्या घसरणीने 8002 अंकांवर स्थिरावला होता.

2018 मध्ये दीर्घकालीन भांडवली नफा कराची अंमलबजावणी केल्याचे पडसाद निफ्टीवर उमटले. निफ्टी 400 अंकांच्या घसरणीसह 10676 अंकांवर बंद झाला होता. वर्षभर होल्ड केल्यानंतर शेअर्सची विक्री केल्यास त्यावर 10% एलटीसीजी आकारण्याची घोषणा सरकारने केली होती.

वर्ष 2020 मध्ये कोविडने जगभरात थैमान घातले. केंद्र सरकारने टाळेबंदीची घोषणा केली. तत्पूर्वी जगातील प्रमुख देशांनी एकामागून एक टाळेबंदी जाहीर केली होती. जागतिक व्यापार ठप्प झाला. महागाईचा भडका उडाला होता. यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा लावला. 1 फेब्रुवारी ते 23 मार्च 2020 रोजी निफ्टीने 12.98% घसरण अनुभवली. निफ्टी पुन्हा 7511 अंकापर्यंत खाली घसरला.

वर्ष 2021 च्या सुरुवातीला कोविडची टाळेबंदी सरली आणि जागतिक व्यापार हळुहळू पूर्वपदावर येऊ लागला. महागाई रोखण्यासाठी जगभरातील सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढीचे धोरण स्वीकारले. बडे संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा शेअर बाजाराकडे परतले. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा तेजीची वाट धरली. ऑक्टोबर 2021 अखेर निफ्टीने तब्बल 18400 अंकांपर्यंत झेप घेतली.

फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाचा भडका उडाला. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील प्रमुख वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला. युरोप आणि अमेरिकेत इंधनांच्या किंमतींनी उच्चांक गाठला. याच काळात कच्चा तेलाचा भाव 139 डॉलर प्रति बॅरल इतका वाढला होता. महागाईने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडणार या भितीने गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधून प्रचंड पैसा काढून घेतला. या काळात निफ्टीने 1800 अंकांची घसरण अनुभवली.