सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती,कमवा शिका सारख्या योजना तसेच विविध राष्ट्रीय कंपन्यामध्ये प्रशिक्षण योजनाही राबवल्या जातात. तसेच यासाठी विद्यार्थ्यांना स्टायफंड (Stipend) देखील दिला जातो. त्याचप्रमाणे हिदुस्थान एरोनॉटिक्सच्या नाशिक विभागाकडून आयटीआय आणि डिप्लोमा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय अप्रेंटिस प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला मानधनही दिले जाणार आहे.
एक वर्षासाठी अप्रेटिंस म्हणून भरती
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये या कंपनीकडून नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम (NATS) आणि राष्ट्रीय अप्रेटिंस प्रमोशन स्कीम (NAPS) राबवण्यात येत आहे. या माध्यमातून ITI, डिप्लोमा आणि पदवीधर विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी अप्रेटिंस म्हणून भरती केले जाणार आहे. या राष्ट्रीय योजनेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर भेट देणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण कालावधीत मिळणार मानधन
एचसीएल यामध्ये आयटीआयच्या 350 डिप्लोमा झालेल्या 111 आणि अभियांत्रिकीच्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 186 जागा भरल्या जाणार आहेत. या प्रशिक्षण कालावधीमध्ये आयटीआय आणि डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 8000 आणि अभियांत्रिकीच्या पदवधीर विद्यार्थ्यासाठी महिन्याला 9000 रुपये मानधन दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अप्रेटिंस म्हणून भरती झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह चांगले मानधनही उपलब्ध होणार आहे. या राष्ट्रीय प्रशिक्षण योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी https://qrco.de/beC1nu या लिंकच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. यासाठीची अंतिम मूदत 23 ऑगस्ट आहे.