Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual fund Vs ULIP: म्युच्युअल फंड किंवा युलिप यापैकी कुठे गुंतवणूक करणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या

Mutual fund Vs ULIP

Mutual fund Vs ULIP: बाजारातील जोखमीच्या अधीन असलेले गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. अनेक कंपन्या चांगल्या परताव्यासह बाजारात आपली गुंतवणूक करतात. सध्या म्यूच्युअल फंड व ULIP (Unit Linked Insurance Plan) असे दोन्ही गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊया यापैकी कुठे गुंतवणूक करणे ठरते फायदेशीर.

बाजारातील जोखमीच्या अधीन असलेले गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. अनेक कंपन्या चांगल्या परताव्यासह बाजारात आपली गुंतवणूक करतात. सध्या म्युच्युअल फंड व ULIP (Unit Linked Insurance Plan) असे दोन्ही गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊया यापैकी कुठे गुंतवणूक करणे ठरते फायदेशीर.

युलिप आणि म्युच्युअल फंड दोन्ही मार्केट लिंक्ड रिटर्न देतात. ULIP योजनांमध्ये प्रिमीयमची संपूर्ण रक्कम बाजारात गुंतवली जात नाही, ती विमा संरक्षणासाठी वापरली जाते. म्युच्युअल फंडामध्ये तुमचे सर्व पैसे बाजारात गुंतवले जातात. त्यामुळे म्युच्युअल फंडातील परतावा जास्त असू शकतो. कारण तुमची गुंतवणुकीची एकूण रक्कम जास्त असते परंतु तुम्हाला लाइफ कव्हर मिळत नाही.

फंड निवडण्याचे स्वातंत्र्य (Freedom to Choose Funds)

गुंतवणूक करण्यासाठी फंड निवडण्याचे स्वातंत्र्य दोन्ही गुंतवणूक योजनांमधील परतावा तुम्ही निवडलेल्या फंडाच्या रकमेवर व प्रकरावर अवलंबून असेल. युलिप योजनांमध्ये तुम्हाला फंडांमध्ये इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये स्विच करण्याची सुविधा मिळते. म्युच्युअल फंडामध्ये, तुमच्यासाठी कोणता फंड म्हणजेच इक्विटी, डेट, हायब्रीड इ. योग्य आहे का? हे तुम्हाला ठरवावे लागेल 

ULIP ही एक विमा योजना आहे. त्यामुळे त्याचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो, तर म्युच्युअल फंड ही पूर्णपणे असे गुंतवणूक साधन आहे. ज्यात 3 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह ELSS फंड हे वगळता कोणताही निश्चित लॉक-इन कालावधी नसतो. दोन्ही उत्पादनांमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

ULIP मध्ये गुंतवणूक केल्यास होईल करबचत (Investing in ULIP Will Save Tax)

युलिपमध्ये गुंतवणूक केल्यास कर बचत देखील होऊ शकते. हा एक प्रकारचा विमा आहे ज्यात जीवन विमा संरक्षण आणि इक्विटी गुंतवणूकीचा फायदा दोन्ही प्रदान करतो. बाजारातील चढउतारांमुळे यूलिप मधील परताव्यावर थेट परिणाम होतो. युलिपमध्ये पाच वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. लॉक-इन कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला पैसे काढण्याची परवानगी असते.  ULIP मध्ये गुंतवता येणारी रक्कम पॉलिसीचा कालावधी, विम्याची रक्कम आणि पॉलिसीधारकाचे वय यासह अनेक अटींवर अवलंबून असते. आर्थिक वर्षात सर्व ULIP साठी भरलेला एकूण प्रीमियम 250000 पेक्षा जास्त असल्यास ULIP मधून मिळणाऱ्या मॅच्युरिटीवर कर आकारला जातो. 


News Source : hindinews18.com