Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund NFO: म्युच्युअल फंडांत गुंतवणूक, ‘व्हाइटओक कॅपिटल मल्टी कॅप फंड’ लाँच

NFO

Mutual Fund NFO: व्हाईटओक कॅपिटल मल्टी कॅप फंड स्मॉल आणि मिड-कॅप विभागासाठी वाजवी एलोकेशनसह "हाय ऍक्टिव्ह शेअर" दृष्टीकोन राखून उत्कृष्ट स्टॉक निवडीवर लक्ष केंद्रित करेल.

व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाने आज त्यांची नवीन फंड ऑफर (NFO) ‘व्हाइटओक कॅपिटल मल्टी कॅप फंड’ लॉन्च करण्याची घोषणा केली. एनएफओ 31 ऑगस्ट 2023 रोजी खुला झाला असून त्यात 14 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल.

व्हाईटओक कॅपिटल मल्टी कॅप फंड ही एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम आहे जी लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करेल. नुकताच या फंडाच्या इक्विटी स्कीमला 1 वर्ष पूर्ण झाले.

व्हाईटओक कॅपिटल मल्टी कॅप फंड स्मॉल आणि मिड-कॅप विभागासाठी वाजवी एलोकेशनसह "हाय ऍक्टिव्ह शेअर" दृष्टीकोन राखून उत्कृष्ट स्टॉक निवडीवर लक्ष केंद्रित करेल. योजना विविध बाजार परिस्थितींमध्ये परतावा अनुकूल करण्यासाठी मार्केट कॅप स्पेक्ट्रममध्ये मालमत्ता धोरणात्मकपणे एलोकेट करेल.

व्हाईटओक कॅपिटल मल्टी कॅप फंडाचे प्राथमिक उद्दिष्ट बाजारातील भांडवलांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन कॅपिटल अप्रिशिएशन/उत्पन्न प्रदान करणे आणि लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ व्यवस्थापित करणे आहे. स्कीम निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 TRI च्या विरुद्ध बेंचमार्क केली जाईल.

या फंडात लार्ज कॅपमध्ये किमान 75%, मिडकॅपमध्ये 25%, स्मॉल कॅपमध्ये 25% गुंतवणूक करण्यात येईल. गुंतवणूकदार किमान 500 रुपयांपासून या फंडात गुंतवणूक करु शकतात. त्यापुढे 1 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येईल.

एक महिन्याच्या आत या योजनेतून बाहेर पडल्यास 1% एक्झिट लोड आकारला जाणार आहे. युनिट्स अलॉट झाल्याच्या एक महिन्यानंतर एक्झिट लोड नसेल, असे कंपनीने म्हटले आहे.