Table of contents [Show]
मोठ्या कालावधीसाठीची गुंतवणूक
सुरक्षित गुंतवणूक असली तरी म्युच्युअल फंडातली गुंतवणूक ही जोखमीची असते. दर महिन्याला गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मात्र हा पर्याय काहिसा कमी जोखमीचा आहे. दर महिन्याचे एसआयपी (Systematic investment plan) गुंतवणूकदार गुंतवणुकीचा कालावधी, इक्विटी परताव्याची सरासरी या सर्वांचा विचार करतात. त्यामुळे मोठ्या कालावधीसाठी ही गुंतवणूक केली जाते. हे करत असताना बाजारातल्या ट्रेंडविषयी खूप विचार करण्याची आवश्यकता नाही.
नियम किंवा आर्थिक नियोजनाचं सूत्र
भविष्यातली सुरक्षित गुंतवणूक म्हणून म्युच्युअल फंड सध्याच्या घडीला एक प्रभावी पर्याय आहे. साधारणपणे वयाच्या तिशीच्या आत एखाद्या नोकरदारानं म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास संबंधित व्यक्तीच्या निवृत्तीच्या वेळी अत्यंत भरीव असा परतावा त्याला मिळू शकतो. त्यासाठीचं नियोजन मात्र सुरुवातीच्या काळात करावे लागते. जर वयाच्या 28-30 या वर्षात म्युच्युअल फंड सुरू केला तर निवृत्ती म्हणजेच 58-60 वयापर्यंत त्याच्या खात्यात काही कोटी रुपये जमा होण्याच्या शक्यता वाढतात. यासाठी काही नियम किंवा आर्थिक नियोजनाचं सूत्र पाळावं लागतं. दर वर्षी स्टेप-अप राखणं गरजेचं आहे.
कोटीची उड्डाणं
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना पुढच्या 15-20-30 वर्षांचा विचार करावा लागतो. समजा 15 वर्षांसाठी महिन्याच्या एसआयपीवर साधारणपणे किती परतावा मिळून शकतो तर जवळपास 15 टक्के उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. यासाठीचा कालावधी बदलला तर उत्पन्नही बदलू शकतं. गुंतवणूकदारानं 30 वर्षांसाठी गुंतवणूक केली असल्यास त्याच्या पैशावर 15 टक्के परतावा मिळू शकतो. एखाद्या गुंतवणूकदाराला 50 कोटींपर्यंत परतावा मिळवायचा असेल, तर सुरुवातीपासूनच एसआयपी म्युच्युअल फंडात सक्रीय व्हावं लागेल. वयाच्या 28-30 या वर्षात गुंतवणूक सुरू केली तर पुढचा कालावधी जवळपास दुपटीनं मिळतो. म्हणजेच वयाच्या साठीपर्यंत तो त्यात गुंतवणूक करत राहणार आहे. त्यानंतर मिळणारा परतावा मोठ्या रकमेच्या स्वरुपात असू शकतो. म्हणजे एखाद्यानं 50 कोटींचं उद्दिष्ट ठेवलं असेल तर ते साध्य करण्यासाठी त्याच्याकडे वेळही पुरेसा असतो.
स्टेप-अपचा पर्याय
सुरुवातीच्या काळात मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यकता नाही. स्टेप-अप हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. यानुसार सुरुवातीच्या टप्प्यावर महिन्याची बचत कमी पातळीवर ठेवावी. यातील जाणकार किंवा सल्लागार गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळण्याच्या हेतूनं 10 टक्के स्टेप-अपचा सल्ला देतात.
असा आहे आकड्यांचा खेळ
आपापल्या नियोजनानुसार 10 किंवा 15 स्टेप-अप केले तर त्यानुसार फायदा होऊ शकतो. 50 कोटींचं उद्दिष्ट साध्य करण्याचा विचार असेल, तर 10 टक्के स्टेप अप असावं. पुढच्या 30 वर्षांचा विचार केल्यास 10 किंवा 15 टक्के स्टेप अपनुसार 15 टक्के परतावा मिळू शकतो. 30 वर्षांसाठीच्या 15 टक्क्यांसाठी गुंतवणूकदाराला प्रतिमहिना 21, 000 रुपये गुंतवावे लागणार आहेत. यातील सल्लागारांच्या मते, सध्या विविध म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत. गुंतवणूकदारानं आपल्या नियोजनानुसार त्याची निवड केल्यास निश्चितच चांगला परतावा मिळू शकतो.