म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजपासून तीन म्युच्युअल फंड योजना खुल्या झाल्या आहेत. बजाज फिनसर्व्ह फ्लेक्झी कॅप फंड, कोटक निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस एक्स बँक इंडेक्स फंड आणि मिरे अॅसेट निफ्टी 1डी रेट लिक्वीड ईटीएफ अशा तीन योजनांमध्ये आजपासून गुंतवणूक सुरु झाली आहे.
लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणारा बजाज फिनसर्व्ह फ्लेक्झीकॅप फंड ही एक ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे. आज सोमवार 24 जुलै 2023 पासून हा फंड गुंतवणुकीसाठी खुला झाला असून तो 7 ऑगस्ट 2023 रोजी बंद होईल. या फंडासाठी एस अॅंड पी बीएसई 500 टीआरआय हा बेंचमार्क आहे. या योजनेत किमान 500 रुपयांपासून त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. एसआयपीचा देखील या योजनेत पर्याय असून गुंतवणूकदाराला दर महिन्याला 500 ते 1000 रुपयांची एसआयपी गुंतवणूक करता येईल.
आजपासून कोटक निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस एक्स बँक इंडेक्स फंड ही गुंतवणूक योजना खुली झाली आहे. यात फंड मॅनेजरकडून पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी फॉलो केली जाणार आहे. ही योजना 7 ऑगस्ट 2023 रोजी बंद होईल. निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस एक्स बँक इंडेक्सच्या प्रमाणात यात गुंतवणूक केली जाईल. या फंडाचे देवेंदर सिंघल, सतीश दोंडापटी आणि अभिषेक भसिन यांच्याकडून व्यवस्थापन केले जाणार आहे.
मिरे अॅसेट निफ्टी 1डी रेट लिक्विड ईटीएफ ही एक ओपन एंडेड स्किम असून तो एक्सचेंज ट्रेडेड फंडाप्रमाणे काम करते. या फंड योजनेत गुंतवणूकदार 26 जुलै 2023 पर्यंत गुंतवणूक करु शकता.