नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड (Knowledge Marine & Engineering Works Ltd.) या समभागात शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रातदेखील उसळी पाहायला मिळाली होती. आशिष कचोलिया यांनी कंपनीतला स्टेक (Stake) वाढवल्यानंतर नॉलेज मरीन आणि इंजिनिअरिंग वर्क्सचे शेअर्स वधारले. नुकत्याच झालेल्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कचोलिया यांनी या समभागातली त्यांची हिस्सेदारी 2.78 टक्क्यांपर्यंत वाढवली. यामुळे कंपनीचे शेअर्स मजबूत झाले आहेत.
गुंतवणूकदार झाले श्रीमंत
या कंपनीचं मार्केट कॅप सुमारे 1300 कोटी रुपये आहे आणि कंपनी मरीन क्राफ्ट आणि ड्रेजिंगची मालकी, संचालन आणि दुरुस्तीचं काम करते. मागच्या एका वर्षात या समभागात 236.09 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ असा, की ज्यांनी आजच्या वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांनी जर आतापर्यंत कंपनीचे शेअर्स ठेवले असते, तर या वेळेपर्यंत त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य 3.36 लाख रुपये झाले असते.
शेअरनं दोन वर्षांत दिला बंपर परतावा
स्मॉलकॅप स्टॉक नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेडच्या (Smallcap Stock Knowledge Marine & Engineering Works Ltd.) समभागांनी मागच्या दोन वर्षात 2,882.36 टक्के जबरदस्त परतावा दिला आहे. 26 मार्च 2021 रोजी या शेअरचा क्लोजिंग रेट फक्त 36.85 रुपये होता. अशाप्रकारे या स्टॉकनं फक्त दोन वर्षांत आश्चर्यकारक अशी कामगिरी केली आहे. ज्यांनी दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य यावेळी 29.82 लाख रुपये झालं असतं.
2023मध्ये घसरला शेअर
या शेअरची किंमत महिनाभरापूर्वीच्या पातळीपेक्षा सुमारे 10 टक्क्यांनी खाली आली आहे. मागच्या सहा महिन्यांत स्टॉक 11.54 टक्क्यांनी घसरला आहे. या समभागात आतापर्यंत 2.67 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आशिष कचोलिया यांच्या इन्व्हेस्टमेंटनंतर स्टेक वाढवल्याच्या वृत्तामुळे या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे.