Astral an Profit-making stock: सीपीव्हीसी पाईप आणि फिटिंग्ज मेकर ऍस्ट्रलने (Astral) लाँग टर्ममध्ये या शेअर्सने त्याच्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे. येत्या काळात ऍस्ट्रलच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याचा विश्वास बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणुकीसाठी 2 हजार 295 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे, जे सध्याच्या किंमतीपेक्षा 15 टक्के जास्त आहे. णागील आठवड्यात बीएसईवर एस्ट्रलचे शेअर्स 1 हजार 993.90 रुपयांवर बंद झाले.
या स्टॉकने 11 वर्षांत कोट्याधीश बनवले (stock made millionaires in 11 years)
नुकतेच, ऑक्टोबर-डिसेंबर 2022 च्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार, चालू तिमाहीत जानेवारी-मार्च 2023 मध्ये पाईप्स विभागात तेजी दिसून येईल असा अंदाज प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजकडून वर्तवण्यात आला आहे.
मागील वर्षी 20 जून 2022 रोजी ऍस्ट्रलच्या शेअर्सची किंमत 1 हजार 584 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर, अवघ्या अडीच महिन्यांत 68 टक्क्यांनी झेप घेऊन 9 सप्टेंबर 2022 पर्यंत हे शेअर्स 2 हजार 654 रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, विक्रीच्या दबावामुळे ते आतापर्यंत 25 टक्क्यांनी घसरले आहे.
13 जानेवारी 2012 रोजी ऍस्ट्रलच्या शेअर्सची किंमत 18.10 रुपये होती. आता त्याची किंमत 10 हजार 916 टक्के वाढीसह 1 हजार 993.90 रुपये झाली आहे, म्हणजेच त्या वेळी गुंतवलेले 1 लाख रुपये आता 1.10 कोटी रुपये झाले आहे. अॅस्ट्रलने कमी कालावधीतही चांगला परतावा दिला असल्यामुळे अधिकाधिक गुंतवणुकदार हा स्टॉक खरेदी करण्यासाठी सरसावत आहेत.
याशिवाय, पीव्हीसीच्या किंमती आता जवळजवळ स्थिर आहेत, त्यामुळे चालू तिमाहीत मार्जिन सामान्य असू शकते. अॅस्ट्रलला यातून नफा मिळण्याची आशा आहे. याशिवाय अधेसिव्ह पदार्थांच्या किमतीही कमी झाल्यामुळे या व्यवसायातही मार्जिन सामान्य राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी पाहता, ब्रोकरेज फर्मने 2 हजार 295 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटींग दिले आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)