Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multi Cap Fund Investment: एचएसबीसी मल्टी कॅप फंड, जाणून घ्या योजनेविषयी

mutual fund investment

Multi Cap Fund Investment: एचएसबीसी म्युच्युअल फंडाने मल्टी कॅप फंडा ही ओपन एंडेड इक्विटी योजना लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करेल. ही योजना 24 जानेवारी 2023 रोजी बंद होईल.

एचएसबीसी म्युच्युअल फंडाने  मल्टी कॅप फंडा ही ओपन एंडेड इक्विटी योजना लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करेल. ही योजना 24 जानेवारी 2023 रोजी बंद होईल. सर्व प्रकारच्या बाजारपेठ भांडवलीकरणात इक्विटी आणि इक्विटीसंलग्न सेक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे हा एचएसबीसी मल्टी कॅप फंडाचा उद्देश आहे.

या फंडात लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप्स गुंतवणुकींना किमान वाटा दिला जाईल (प्रत्येकी किमान 25%) आणि उर्वरित25% भागाची गुंतवणूक इक्विटी किंवा डेट सेक्युरिटीजमध्ये तसेच मनी मार्केट पर्यायांमध्ये लवचिक स्वरुपावर करण्यात येईल. एचएसबीसी मल्टी कॅप फंडमुळे एचएसबीसी असेट मॅनेजमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने एलअॅण्डटी एएमसी आणि एलअॅण्डटी म्युच्युअल फंडावया स्कीम्सचे संपादन केल्यानंतरच्या एचएसबीसी म्युच्युअल फंड या पहिल्याच एनएफओमध्ये आता सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या म्युच्युअल फंडाच्या वर्गीकरण आणि सुसूत्रीकरणासंदर्भातील नियमांनुसार म्युच्युअल फंडाच्या वर्गीकरणात कमाल विभागातील फंड उपलब्ध आहेत. एचएसबीसी सेक्युरिटीज अॅण्ड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडकडे एचएसबीसी एएमसीचे 100% पेड-अप समभाग आहेत.

एचएसबीसी मल्टी कॅप फंड सादर करून आम्ही गुंतवणूकदारांना लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमधील गुंतवणुकीची संधी देते . या एकाच फंडात गुंतवणूकदारांना तीन लाभ मिळतात. लार्ज कॅपमध्ये नकारात्मक परतावा मिळण्याची शक्यता कमी असते किंवा दीर्घकाळात समभागांमध्ये घसरण होण्यावर मर्यादा येतात, मिड कॅप्समध्ये प्रचंड प्रगती करण्याच्या क्षमता असतात आणि स्मॉल कॅप्समुळे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक असते, असे मत एचएसबीसी असेट मॅनेजमेंटचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी (को-सीईओ) कैलाश कुलकर्णी यांनी सांगितले. 

एचएसबीसी मल्टी कॅप फंडातील फायदे आणि वैशिष्ट्ये:

  • सुयोग्य संशोधन झालेल्या लार्ज कॅप्समध्ये आजवरच्या व्यावसायिक यश आणि कामातील सातत्यासह उत्पन्नात वाढ होण्याची क्षमता 
  • मिड कॅप्स हे तुलनेने अंडर ओन्ड स्टॉक्स असल्याने त्यात साधारपणे चुकीचे मुल्यांकन आणि चुकीच्या किमतींची शक्यता असते 
  • स्मॉल कॅप्समध्ये संधी मोठ्या असतात. कारण, यात अंडर-रिसर्च/अंडर ओन्ड वैशिष्ट्यांमुळे मुल्यांकनात सवलत मिळू शकते.
  • हा फंड फायदेशीर बाजारपेठीय आवर्तनांमध्ये किंवा डेट सेक्युरिटीजमध्ये आणि मनी मार्केट पर्यायांमधील विशिष्ट मार्केट कॅपवर क्षमतेहून अधिक पुढे जाऊ शकतो त्यामुळे संपत्तीच्या काही भागासाठी लवचिक मालमत्ता वाटप धोरण राबवता येते. यामुळे गुंतवणूकदारांना एकाच फंडातून विविध बाजारपेठीय आवर्तनांचा लाभ मिळवता येतो.