मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्सनं डेटा सेंटरच्या उद्योगात (Data center business) स्वारस्य दाखवलं असून आता त्यासंबंधीच्या बिझनेस डील्सनाही सुरुवात झाली आहे. देशात डेटा सेंटर विकसित करण्याच्या दृष्टीनं रिलायन्सनं या क्षेत्रातल्या ब्रुकफील्ड इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजीटल रियल्टी यात गुंतवणूक (Investment) करण्याचं ठरवलं आहे. या दोन्ही कंपन्यांमधला जवळपास 33.33 टक्के इतका हिस्सा रिलायन्स खरेदी करणार आहे. सध्या 378 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तर टप्प्याटप्प्यानं त्यात वाढ केली जाणार आहे. ही वाढ 622 कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच आताच्या दुप्पट असणार आहे.
Table of contents [Show]
किती कालावधी?
संबंधित कंपन्यांसोबत रिलायन्सची डील झाली आहे खरं. पण अशा व्यवहारांवर लक्ष देणाऱ्या नियामकाकडून परवानगी अजूनतरी मिळालेली नाही. कदाचित या सर्व प्रक्रियेला काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. येत्या 3 महिन्यांत हा करार पूर्ण होण्याची अपेक्षा रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. डेटा सेंटरच्या व्यवसायात या दोन्ही कंपन्या अत्यंत चांगलं काम मागील काही कालावधीपासून करत आहेत. मूलभूत आणि पायाभूत सुविधा कंपन्यांमार्फत पुरवल्या जातात. उच्च गुणवत्ता आणि मागणीनुसार डेटा सेंटर्स उभारली जातात.
अडाणींची आधीच उपस्थिती
अब्जाधीश असलेले उद्योगपती गौतम अदानी विविध व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यानी डेटा सेंटरच्या या व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा आधीच केली होती. त्यासाठी अडाणी कनेक्स (AdaniConneX) असा एक संयुक्त उपक्रमही कंपनीनं हाती घेतला आहे. देशातल्या विविध भागात डेटा सेंटर्स कंपनीतर्फे उभारली जातील . त्यात नोएडा याठिकाणचं काम तर सुरूदेखील झालं आहे. तर देशभरात साधारणपणे 3 सेंटर्स उभारली जाणार असून त्यासाठी 2023ची डेडलाइन ठरवण्यात आली आहे.
देशाबाहेरही असणार डेटा सेंटर्स
देशाबाहेरदेखील हे काम केलं जाणार आहे. त्यात पूर्वेकडचं सिंगापूर, थायलंड, नेपाळ तर पश्चिमेकडचा देश संयुक्त अरब अमिरात याठिकाणी ही सेंटर्स प्रस्तावित आहेत. हे सर्व डेटा प्रोसेसिंग हब असणार आहेत.
रिलायन्सचाही संयुक्त उपक्रम
अडाणींप्रमाणेच रिलायन्सचादेखील संयुक्त उपक्रमच असणार आहे. डिजीटल कनेक्शन: ए ब्रुकफील्ड, जिओ आणि डिजीटल रियल्टी कंपनी असं या संयुक्त उपक्रमाचं नाव असणार आहे. हा उपक्रम मुंबई त्याचप्रमाणे चेन्नई इथल्या काही ठिकाणी डेटा सेंटर उभारेल.
पहिलं डेटा सेंटर कधी?
या कराराला अंदाजे 3 महिने लागणार आहेत. त्या अनुषंगानं कामास सुरुवात झाली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत चेन्नई इथलं जेव्हीचं 20 मेगावॅट क्षमतेचं ग्रीनफिल्ड डेटा सेंटर चेन्नई इथल्या 100 मेगावॅटच्या परिसरात पूर्ण करण्याचं टार्गेट असणार आहे. डिजीटल इकॉनॉमी बनवण्याच्या दृष्टीनं आम्ही हातभार लावत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.