Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rich Person: जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी; फ्रान्सच्या फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स यांनाही टाकले मागे

Mukesh Ambani Top Rich Person

Mukesh Ambani Top Rich Person: जगातील अव्वल ५० श्रीमंतांपैकी केवळ चार जणांच्या संपत्तीत गुरुवारी वाढ झाली. भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचाही यामध्ये समावेश होता. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, गुरुवारी अंबानींच्या संपत्तीत 1.57 अब्ज डॉलर म्हणजेच 1,29,76,70,94,000 रुपयांची वाढ झाली आहे. यासह, त्यांची एकूण संपत्ती 90.8 अब्ज डॉलर झाली.

Top Rich Person In The World: ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaire Index) गुरुवारी अंबानींच्या संपत्तीत 1.57 अब्ज डॉलर म्हणजेच 1,29,76,70,94,000 रुपयांची वाढ झाली आहे. यासह, त्यांची एकूण संपत्ती 90.8 अब्ज डॉलर झाली आणि मुकेश अंबानी  जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 12 व्या क्रमांकावर पोहोचले. त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत महिला फ्रान्सच्या फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स यांना पराभूत करून हे स्थान मिळवले आहे. अंबानींच्या संपत्तीत यावर्षी ३.६६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

कुणाची संपत्ती किती?

दरम्यान, जगातील सर्वात मोठे अब्जाधीश एलोन मस्क यांच्या संपत्तीत गुरुवारी 4.25 अब्ज डॉलरची घट झाली. त्यांची एकूण संपत्ती आता २४४ अब्ज डॉलर इतकी आहे. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या फ्रान्समधील बर्नार्ड अर्नॉल्ट यांची निव्वळ संपत्ती गुरुवारी ६.११ अब्ज डॉलरने घसरली झाली आणि ती १९० अब्ज डॉलरवर राहिली. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी गुरुवारी 2.08 अब्ज डॉलर गमावले. त्यामुळे 153 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत बिल गेट्स चौथ्या क्रमांकावर तर लॅरी एलिसन पाचव्या क्रमांकावर आहेत.

टॉप 10 श्रीमंत?

टॉप 10 श्रीमंतांपैकी फक्त स्टीव्ह बाल्मरची संपत्ती गुरुवारी वाढली. 118 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तो जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत गुरुवारी 54.3 दशलक्ष डॉलर्सची घट झाली आणि 60.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते 21 व्या क्रमांकावर आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण?

कॉस्मेटिक्स ब्रँड लॉरियलची वारसदार फ्रान्सची फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स ही जगातील सर्वात श्रीमंत महिला आहे, त्यांची एकूण संपत्ती 89.2 अब्ज डॉलर आहे. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती १७.७ अब्ज डॉलरने वाढली आहे. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची लॉरिअलमध्ये 33 टक्के हिस्सेदारी आहे. हा व्यवसाय त्यांना त्यांच्या आई लिलियान बेटेनकोर्टकडून मिळाला. लिलियान बेटेनकोर्टचे वडील यूजीन श्युलर यांनी लॉरियल ब्रँड सुरू केला. फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स 1997 पासून लॉरियलच्या संचालक मंडळावर आहेत. गुरुवारी त्यांची एकूण संपत्तीत २.५४ अब्ज डॉलरने घसरण झाली.