Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MPL 2023: एमपीएलमधील क्रिकेट संघांचे मालक पैसे कसे कमावतात?

HOW TO MAKE MONEY MPL TEAM

MPL 2023: क्रिकेटचे सामने हा आता फक्त खेळ राहिला नसून, त्याला T20 क्रिकेट सामन्यांमुळे व्यवसायाचे स्वरूप आले आहे. या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या टीमचे मालक क्रिकेट टीमवर आणि टीममधील खेळाडुंवर भरपूर पैसे खर्च करतात. पण यातून टीमच्या मालकांना किती आणि कसा पैसा मिळतो, हे आपण जाणून घेणार आहोत.

MPL 2023: नुकत्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंडियन प्रीमिअर लीगच्या T20 क्रिकेटच्या मॅचेस संपल्या. या लीगमध्ये भरपूर पैसा खर्च केला जातो आणि तितक्याच प्रमाणात टीमच्या मालकांकडून पैसा कमवला देखील जातो. या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या टीमचे मालक क्रिकेट टीमवर आणि टीममधील खेळाडुंवर भरपूर पैसे खर्च करतात. या टीम मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकीच्या आहेत. एक आयपीएल/एमपीएलची टीम उभी करण्यासाठी किंवा खेळवण्यासाठी खूप सारा पैसा गुंतवला जातो. पण यातून टीमच्या मालकांना किती आणि कसा पैसा मिळतो. हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे.

महाराष्ट्र प्रीमिअर लीगसाठी 6 संघ सज्ज झाले असून, हा थरार उद्यापासून (दि. 15 जून) पुण्यातील गाहुंजे स्टेडिअममधून क्रिकेट रसिकांना अनुभवता येणार आहे. या प्रीमिअरमध्ये क्रिकेटमधील टॉप प्लेअर्स सहभागी होणार आहेत. तसेच या लीगमधील विजेत्या टीमला 50 लाख रुपयांचे तर रनर-अप टीमला 25 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. फायनल जिंकणाऱ्या टीमला किती रुपयांचे बक्षिस मिळणार, हे तर आपल्याला कळले आहे. पण महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 मध्ये आपापले संघ घेऊन उतरलेल्या कंपन्यांना कशातून आणि कशाप्रकारे फायदा होतो. हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.


फ्रॅन्चायसी फी म्हणून 57.80 कोटी रुपयांची कमाई

ज्याप्रमाणे आयपीएलमध्ये एखाद्या टीमची निवड झाली की, त्याचा फायदा बीसीसीआय (Board of Control for Cricket in India - BCCI) होतो. त्याचपद्धतीने महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेतून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएनशनला होत आहे. एमपीएल 2023 या लीगमधून एमसीएला फ्रॅन्चायसी फी म्हणून 57.80 कोटी रुपये 6 टीमकडून मिळाले आहेत.

सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क (Media Rights)

क्रिकेटचे सामने हा आता फक्त खेळ राहिला नसून, त्याला T20 क्रिकेट सामन्यांमुळे व्यवसायाचे स्वरूप आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा टाकला जात आहे. या अशा T20 क्रिकेट लीगचे आयोजन करणाऱ्या आयोजकांनाही यातून वेगवेगळ्या माध्यमातून पैसा मिळत आहे. ज्याप्रमाणे बीसीसीआयने या सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क विकून भरपूर महसूल मिळवला. त्याच धर्तीवर एमपीएलचे सामने प्रेक्षकांना डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवर पाहता येणार आहे.

प्रायोजकत्व (Sponsorship)

आयपीएल असो किंवा एमपीएल असो प्रायोजकत्व (स्पॉन्सरशिप) हा पैसे मिळवण्याचा सर्वांत मोठा मार्ग आहे. तुम्ही टीममध्ये खेळणाऱ्या खेळाडुंच्या जर्सी पाहता. त्यावर वेगवेगळ्या कंपन्यांचे लोगो आणि नावं असतात. तसेच ते वापरत असलेले कीट, क्रिकेटची बॅट आणि सामना सुरू असताना मैदानाच्या बाजुने लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती यातून टीम मालकांना भरपूर पैसा मिळतो. जाहिरात देणाऱ्या कंपन्या या खेळाडुंच्या मालकांना कोट्यवधी रुपये देतात.

टीमच्या नावाने विविध वस्तुंची विक्री

टीमच्या मालक कंपन्या या वेगवेगळ्या वस्तुंची विक्री करून थेट ग्राहकांकडूनही पैसे मिळवतात. जसे की, टीमच्या नावाने कॅप्स, जर्सी, जॅकेट्सची ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष विक्री करतात. तसेच खेळाडुंची सही असलेले कीट विशेष बोली लावून विकले जातात.

ब्रॅण्ड व्हॅल्यू (Brand Value)

एमपीएल संघाची ब्रॅण्ड व्हॅल्यू हा सुद्धा पैसे मिळवण्याचा मार्ग आहे. ज्या टीममध्ये स्टार खेळाडू असतात. त्या टीमची ब्रॅण्ड व्हॅल्यू जास्त असते. त्यामुळे अर्थातच जाहिरातीतून मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ होते. त्याचबरोबर जी टीम किंवा खेळाडू लीगमध्ये चांगला खेळ खेळतो. त्यामुळेदेखील जाहिरातीच्या रकमेमध्ये वाढ होते. आयपीएलचा विचार करता मुंबई इंडियन्स या टीमची ब्रॅण्ड व्हॅल्यू सर्वाधिक होती.

भागभांडवलाची विक्री (Selling Stake)

एमपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या टीमचे मालक टीममधील हिस्सा विकून देखील भरपूर पैसे कमावतात. एमपीएलमध्ये अजून असे झालेले नाही. पण आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये जिंदाल साऊथ वेस्टने गुंतवणूक करून 50 टक्के भागीदारी मिळवली होती. 

याशिवाय क्रिकेट सामन्यांची स्टेडिअममधील तिकिटे हा एक महसूल मिळवण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. यातून जवळपास 10 ते 15 टक्के महसूल मिळतो. तसेच विजेत्या संघाला मिळणारी बक्षिसाची रक्कम हा सुद्धा एक महसुलाचा भाग आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून क्रिकेट संघांचे मालक पैसे मिळवतात. T20 च्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच यातील पैशांमुळे आयपीएलच्या धर्तीवर वेगवेगळ्या राज्यांनी राज्य पातळीवरील T20 लीग सुरू केल्या आहेत. एमपीएल प्रमाणेच तमिळनाडूमध्ये देखील टीएनपीएल (Tamil Nadu Premier League 2023) लीग सुरू झाली आहे.