Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio True 5G: ग्राहकांना ट्रू 5G ची सुविधा देण्यासाठी रिलायंस जिओचा मोटोरोलाशी करार

True 5G

मोटोरोला मोबाईल ग्राहकांना आता ' ट्रू 5G' सुविधेचा फायदा घेता येणार आहे. जाणून घ्या रिलायंस जिओ आणि मोटोरोला कंपनी यांमध्ये काय करार झालाय.

भारतात मोटोरोला मोबाईल फोनच्या ग्राहकांना ‘ट्रू 5G’ सेवा प्रदान करण्यासाठी रिलायन्स जिओने (Reliance Jio) बुधवारी मोटोरोलासोबत (Motorola) आपली भागीदारी जाहीर केली आहे. मोटोरोला मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना आता  5G इंटरनेट (5 G Internet) सुविधेचा अमर्याद वापर करता येणार आहे.   


मोटोरोला स्मार्टफोन कंपनीने एक सॉफ्टवेअर अपडेट आणले आहे. याद्वारे वापरकर्त्यांना त्यांच्या 5G पोर्टफोलिओमध्ये ‘Jio True 5G’ चा वापर करता येणार आये  जिथे  Jio True 5G सुविधा उपलब्ध आहे अशा भागात मोटोरोला डिव्हाइस वापरणारे सर्व जिओ वापरकर्ते ‘जिओ वेलकम’ ऑफर अंतर्गत अमर्यादित 5G इंटरनेट वापरू शकतील, असे कंपनीद्वारे जाहीर करण्यात आले आहे.