• 26 Mar, 2023 15:37

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Motilal Oswal MF: मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने तीन इंटरनॅशनल फंडांमधील गुंतवणूक रोखली

Motilal Oswal MF

Motilal Oswal MF: मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने तीन इंटरनॅशनल फंडातील गुंतवणूक रोखली आहे. मोतीलाल ओसवाल एसअॅंडपी 500 इंडेक्स फंड, मोतीलाल ओसवाल एमएससीआय ईएएफई टॉप 100 सिलेक्ट फंड आणि मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 फंड ऑफ फंड या तीनही फंडामध्ये नव्याने गुंतवणूक न स्वीकारण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने तीन इंटरनॅशनल फंडातील गुंतवणूक रोखली आहे. मोतीलाल ओसवाल एसअॅंडपी 500 इंडेक्स फंड,  मोतीलाल ओसवाल एमएससीआय ईएएफई टॉप 100 सिलेक्ट फंड आणि मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 फंड ऑफ फंड  या तीनही फंडामध्ये नव्याने गुंतवणूक न स्वीकारण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

येत्या 10 मार्चपासून या तीनही इंटरनॅशनल म्युच्युअल फंडात नव्याने गुंतवणूक स्वीकारली जाणार नाही, असे मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाकडून जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी कोटक आणि एडलवाईज या कंपन्यांनी इंटरनॅशनल म्युच्युअल फंडांतील नवीन गुंतवणूक रोखली होती.

परदेशातील फंड्स आणि सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता मर्यादित वाव आहे. त्यामुळे  मोतीलाल ओसवाल एसअॅंडपी 500 इंडेक्स फंड,  मोतीलाल ओसवाल एमएससीआय ईएएफई टॉप 100 सिलेक्ट फंड आणि मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 फंड ऑफ फंड या फंड योजनांमध्ये नवीन गुंतवणूक, एकरकमी गुंतवणूक आणि सिस्टेमॅटिक ट्रान्सफर रोखण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र नियोजनबद्ध गुंतवणूक, रिडम्प्शन आणि सिस्टेमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन यावर कोणतेही निर्बंध नाहीत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. 'मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 ईटीएफ' आणि 'मोतीलाल ओसवाल नॅसडॅक क्यू 50' मध्ये थेट युनिट्स खरेदी करण्यास परवानगी कायम आहे.

1 जानेवारी 2023 पासून या पाचही इंटरनॅशनल फंडांत  गुंतवणूक पूर्ववत झाली 

मोतीलाल ओसवाल फंड घराण्याच्या मोतीलाल ओसवाल एसअॅंडपी 500 इंडेक्स फंड (Motilal Oswal S&P 500 Index Fund), मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 ईटीएफ (Motilal Oswal NASDAQ 100 ETF), मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 फंड ऑफ फंड (Motilal Oswal NASDAQ 100 Fund of Fund), मोतीलाल ओसवाल एमएससीआय ईएएफई टॉप 100 सिलेक्ट इंडेक्स फंड (Motilal Oswal MSCI EAFE Top 100 Select Index Fund) आणि मोतीलाल ओसवाल नॅसडॅक क्यू 50 ईटीएफ (Motilal Oswal NASDAQ Q 50 ETF) या पाच फंडांवर 1 डिसेंबर 2022 पासून सेबीने निर्बंध लागू केले होते. सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना परदेशातील सिक्युरिटीज आणि फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी 7 बिलियन डॉलर्सची मर्यादा ठेवली आहे. मोतीलाल ओसवाल फंडाने ही मर्यादा पूर्ण केली होती. त्यामुळे सेबीने मोतीलाल ओसवालला इंटरनॅशनल म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक नवी गुंतवणूक स्वीकारण्यास मज्जाव केला होता. निर्बंधांमध्ये इंटरनॅशनल फंडात दोन लाख रुपयांची गुंतवणूक मर्यादा ठेवण्यात आली होती. प्रत्येक पॅन क्रमांकावर इंटरनॅशनल फंडात केवळ दोन लाखांची गुंतवणूक करण्याचे बंधन होते. तसेच या फंडांमध्ये एसआयपी किंवा एसटीपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास परवानगी नव्हती. आता मात्र हे सर्व निर्बंध दूर करण्यात आल्याचे मोतीलाल ओसवाल एएमसीने म्हटले आहे. आता 1 जानेवारी 2023 पासून या पाचही इंटरनॅशनल फंडांत कोणत्याही निर्बंधांशिवाय गुंतवणूक करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.