Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Frauds: युपीआय पेमेंट करताना 95 हजारांपेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक, घ्यायला हवी विशेष काळजी

UPI payment

आता तर भारतीय डिजिटल UPI पेमेंट प्रणालीला जागतिक मान्यता मिळाली आहे. सिंगापूर, यूएई, मॉरिशस, नेपाळ आणि भूतान या देशांमध्ये UPI पेमेंटने व्यवहार केले जात आहेत. परंतु UPI पेमेंट करताना नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यायला हवी. चला तर जाणून घेऊयात अशाच काही टिप्स, ज्याद्वारे तुम्ही ऑनलाईन फसवणुकीपासून वाचू शकाल.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जारी केलेल्या माहितीनुसार युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे मे महिन्यातील आर्थिक व्यवहार 9 अब्जांवर पोहोचले आहेत. गेल्या काही वर्षांपासून युपीआय पेमेंटच्या वापरात सातत्याने वाढ होते आहे. परंतु गेल्या काही वर्षात पेमेंट करताना अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचे देखील समोर आले आहे.

मार्च 2023 मध्ये संसदेत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सादर केलेल्या माहितीनुसार 2022-23 या आर्थिक वर्षात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे 125 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाले होते. यादरम्यान 95 हजारांहून अधिक लोक UPI पेमेंट करताना फसवणुकीचे बळी ठरले आहेत.

आता तर भारतीय डिजिटल UPI पेमेंट प्रणालीला जागतिक मान्यता मिळाली आहे. सिंगापूर, यूएई, मॉरिशस, नेपाळ आणि भूतान या देशांमध्ये UPI पेमेंटने व्यवहार केले जात आहेत. परंतु UPI पेमेंट करताना नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यायला हवी. चला तर जाणून घेऊयात अशाच काही टिप्स, ज्याद्वारे तुम्ही ऑनलाईन फसवणुकीपासून वाचू शकाल. 

क्यूआर कोडची विश्वासार्हता

युपीआय पेमेंटचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवणे. परंतु क्यूआर कोडद्वारे फसवणूक होण्याची प्रकरणे देखील गेल्या काही काळात वाढली आहेत. सायबर चोर ग्राहकांना चुकीचे  क्यूआर कोड स्कॅनर पाठवून पैसे घेत असल्याचे आढळले आहे.नुकतेच केदारनाथ मंदिराच्या परिसरात देवस्थानाला देणगी देण्याच्या नावाखाली श्रद्धाळूंना खासगी क्यूआर कोड स्कॅनर पाठवून पैसे लंपास करणारी टोळी नुकतीच पकडली गेली. त्यामुळे क्यूआर कोडची विश्वासार्हता हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतर खात्याचे नाव तपासून बघा. ज्या खातेदाराला तुम्हांला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव जर स्कॅनरवर दिसत असेल तरच पैसे पाठवा.

UPI लिंकची तपासणी 

तुम्हाला जर कुणा अनोळखी व्यक्तीकडून कुठल्याही कारणासाठी ईमेल, मेसेज किंवा WhatsApp वर लिंक मिळाल्यास त्यावर क्लिक करण्याची चूक अजिबात करू नका. ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. यामुळे तुमचा फोन हॅक होऊ शकतो आणि तुमच्या फोनमधील तुमची खासगी माहिती, बँकेचे तपशील, पासवर्ड आदी संवेदनशील माहिती चोरी होऊ शकते. त्यातून तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

सुरक्षित वाय-फाय कनेक्शन

UPI व्यवहार करताना सुरक्षित वाय-फाय कनेक्शन आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या. अनेकदा असे होते की तुमचे मोबाईल नेटवर्क चालू नसते आणि त्यामुळे तुम्हाला पेमेंट करणे अवघड होऊन बसते. अशा परिस्थितीत ओपन, सार्वजनिक वाय-फाय वापरून पेमेंट करण्याची चूक करू नका.  UPI व्यवहार करण्यासाठी फक्त सुरक्षित असे वाय-फाय कनेक्शन किंवा मोबाईल डेटा वापरा. सार्वजनिक वाय-फाय वापरल्याने तुमचा वैयक्तिक डेटा, बँकेचे तपशील चोरी होण्याची शक्यता अधिक आहे.