समीरच्या वडिलांनी शेवटी नाही नाही म्हणता वाडीतले जुने घर विकले आणि विक्रीतून आलेल्या 15 लाख रुपयांचे नेमके काय करायचे याचे दोघेजण नियोजन करत बसले. मोठ्या पगाराच्या नोकरीवर असलेल्या समीरने नुकताच सर्व कुटुंबीयांसाठी मोठा फ्लॅट घेतला होता.
फ्लॅटसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते अर्थातच समीर भरत होता अशावेळी हाती आलेली मोठी रक्कम भरून गृह कर्जाचा भार कमी करण्याचा विचार समीरच्या मनात घोळत होता. जर तुमच्याही मनात असाच विचार घोळत असल्यास, अशा परिस्थितीत काय करणे योग्य ते आपण पाहूया.
Table of contents [Show]
रक्कम योजनांमध्ये गुंतवायची?
समीर काय किंवा दुसरी कोणीही कर्ज असलेली व्यक्ती काय हातात मोठी रक्कम आल्यावर ती रक्कम कर्जापोटी भरून कर्ज कमी करणे किंवा संपवणे हाच विचार करते. परंतु, फायनान्शिअली एक्स्पर्टचा सल्ला घेतल्यास तुमच्या लक्षात येईल की, हातात आलेली मोठी रक्कम ही विविध दीर्घकालीन गुंतवणूक योजना जसे, फिक्स डिपॉझिट (FD), म्युच्युअल फंड्स, शेअर्स इत्यादी योजनांमध्ये गुंतवणे हे जास्त योग्य ठरते.
हप्ते नियमित भरणे योग्य!
गृह कर्ज घेतले असल्यास कर्जाच्या सुरुवातीच्या कालावधीत म्हणजेच पहिल्या पाच ते दहा वर्षात गृह कर्जाच्या व्याजाचा अधिकतम भाग भरला जातो. अशावेळी मोठी रक्कम भरून कर्ज कमी करण्यापेक्षा नियमित हप्ते सुरू ठेवणे कधीही श्रेयस्कर ठरते.
मिळेल आकर्षक व्याजदर!
एवढा पैसा हाती असल्यावर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे योग्य ठरते. कारण, या म्युच्युअल फंडमध्ये योग्य प्रकारे मोठी गुंतवणूक केल्यास त्यावर मिळणाऱ्या आकर्षक व्याजदरातून तुमच्या भविष्यातील अनेक गरजा जसे मुलांचे शिक्षण, हॉस्पिटललायझेशन इत्यादी पूर्ण होऊ शकतात.
कर सवलतीचा मिळेल फायदा
गृह कर्जाचे EMI चालू ठेवल्यास तुम्हाला कर कपातीचे फायदे मिळतात. त्यामुळे मोठी रक्कम जमा करण्याआधी ही गोष्ट ध्यानात घेणं महत्वाचे आहे.
हाती आलेल्या मोठ्या रकमेची आयुष्याच्या मध्यावर केलेली योग्य गुंतवणूक ही निवृत्तीनंतर नक्कीच मोठा आधार ठरते. निवृत्ती योजनेत गुंतवलेले पैसे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखदायी करू शकते.
त्यामुळे तुमच्या हाती चांगला पैसा आला असेल आणि कर्ज फेडत असताना काही वर्ष निघून गेली असतील. तेव्हा अशावेळी तो पैसा काही योजनांमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते. त्यामुळे तुमच्याजवळ अजून एक मोठी रक्कम जमा व्हायला मदत होऊ शकते.