Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Saving Tips: बचतीचा पैसा योग्यप्रकारे कसा गुंतवावा? हे मुद्दे लक्षात ठेवा

Money Saving Ideas

Money Saving Tips: आपण फार कष्टाने पैसे कमावतो आणि त्यामधून बचत (Money Saving) देखील करतो. मात्र योग्य बचत कुठे आणि कशाप्रकारे करायची? तसेच आपल्या मिळकतीच्या किती टक्के बचत करायची? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

Money Saving Tips: तुम्हाला आठवतं का? आधी तुमचे आजी-आजोबा किंवा घरातील वडीलधारी माणसे तुम्हाला पिगीबॅंकमध्ये पैसे कसे साठवून ठेवायचे ते सांगायचे. आपल्या मिळकतीचा काही हिस्सा बचत करुन ठेवणे, ही एक चांगली सवय आहे. त्याचबरोबर दररोज काहीना काही बचत करणे ही देखील एक चांगली सवय आहे. यासाठी आपण बचत खाते (Saving Account) उघडायला पाहिजे. बचत खात्यावर आपल्याला जे काही व्याज मिळते, ते आपल्याला आजच्या महागाईवर मात करण्यास पुरेसे नाही. मात्र नियमित बचतीची सवय आपल्याला अनेक फायदे देणारी ठरू शकते. जेव्हा पैशांची गरज असते; तेव्हा याचा उपयोग होतो. याशिवाय मेहनतीने मिळवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यास बचत खात्याची मदत होते. बचत खात्याप्रमाणेच पैसे योग्य पद्धतीने कोठे आणि कसे गुंतवायचे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

मोठ्या आणि तरल गुंतवणुकीपासून सावध रहा (Keep Distance From Big Risky Investment)

काही मालमत्ता या कमी वेळेत लिक्विडेट म्हणजेच रोख (पैशाच्या स्वरुपात) स्वरूपात रुपांतरित करणे कठीण असते. जसे की, तुम्ही साठवलेल्या पैशांतून एखादे घर विकत घेतले. पण अचानक तुम्हाला पैशांची गरज पडली. तर ते राहते घर लगेच आणि योग्य त्या किमतीत विकले जाईलच, याची शाश्वती नसते. यासारख्याच अनेक अशा वस्तु ज्या तुम्ही विकायला गेल्यास तात्काळ पैसे मिळणार नाही, अशा वस्तुंमध्ये बचत केलेला पैसा गुंतवू नका.

अस्थिर मालमत्तेत जास्त गुंतवणूक करू नका (Don't Invest too much in Volatile Assets)

अस्थिर मालमत्ता म्हणजे स्मॉलकॅप स्टॉक (Small Cap Stocks). अस्थिर मालमत्तेची विक्री काही दिवसांमध्ये करणे शक्य असते. मात्र आपल्याला गरज असेल तेव्हा, त्याची योग्य किंमत मिळेलच असे निश्चित सांगता येत नाही. जर तुमचे सर्व पैसे शेअर्समध्ये गुंतवले (Shares Investment) गेले असतील आणि तुम्हाला गरज असेल तेव्हाच जर का शेअर्स पडले किंवा तुम्ही ज्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले, त्यांचे दर जर का वाढले नाही, तर तुम्हाला गरजेच्यावेळी योग्य मोबदला मिळणार नाही. तुमचे बचतीचे पैसे स्मॉलकॅप स्टॉक्ससारख्या अस्थिर मालमत्तेमध्ये गुंतवण्याऐवजी, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कमी जोखीम असलेल्या ठिकाणी गुंतवा, जसे की ब्लुचिप स्टॉक. त्यांची वाढ होण्याची शक्यता स्मॉल कॅप समभागांइतकी आकर्षक नसली, तरी त्यांच्या किमती अधिक स्थिर असतात. शिवाय अनेक फायदे देखील असतात, याचा अर्थ तुम्ही एकाच वेळी स्थिर उत्पन्न मिळवू शकता.

लवचिक पर्यायांसह आर्थिक उत्पादने निवडा (Choose Financial Product With Flexible Options)

आर्थिक उत्पादनातील लवचिकता (Flexibility)अनपेक्षित परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते. ज्यावेळी तुम्हाला रोख रक्कमेची आवश्यकता असते, त्यावेळी तुमची गरज पूर्ण होऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या अश्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवा जी पॉलिसीच्या परिपक्वतेवर 100% भांडवली परताव्याची हमी देईल. तुम्हाला मृत्यू आणि गंभीर आजारांपासून संरक्षण देईल. ही गुंतवणुनक प्रत्येक महिन्यात अल्प प्रमाणात करावी लागत असली, तरी परतावा आणि गरज भासल्यास रोख रक्कम हाती देण्याची हमी देते.

आपण किती बचत आणि गुंतवणूक करावी? (How much Save and How much Invest)

सुरक्षित आर्थिक भविष्य सुनिश्चित करण्यासाठी बचत करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, तुम्ही केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीच्या (Investment) वर तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या किमान २० टक्के रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवू इच्छित असाल, तर तुमचे एकुण सहा महिन्यांचे उत्पन्न जमा होईपर्यंत बचत करण्याचे ध्येय ठेवा. हा आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार करतो. अत्यंत गरजेच्या परिस्थितीत जेव्हा तुम्हाला तात्काळ रोख रकमेची गरज भासते. तेव्हा तुम्ही तुमची गुंतवणूक रद्द करण्याऐवजी किंवा महागडी कर्जे घेण्याऐवजी, त्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी तुमचा आपत्कालीन निधी वापरू शकता. एकदा तुम्ही तुमचा आपत्कालीन निधी तयार केल्यावर, तुमचे पैसे तुमच्यासाठी अधिक उपयोगी असे शस्त्र बनवण्यासाठी गुंतवणुकीच्या संधी शोधा.

(डिसक्लेमर: कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा अथवा कुठलीही पॉलिसी घेण्याचा सल्ला देत नाही.)       

(News Source:Manulife)