Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Saving Tips: खर्च कमी करून जास्तीत जास्त बचत करायची आहे, मग 'या' 5 टिप्स नक्की फॉलो करा

Money Saving Tips

Image Source : www.idfcfirstbank.com

Money Saving Tips: हल्ली महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे तुम्हाला खर्च कमी करून जास्तीत जास्त बचत करायला हवी.आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त बचत करू शकता.

सध्या महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर देखील वाढले आहेत. अशा परिस्थितीत बचतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुम्हाला खर्च कमी करून जास्तीत जास्त बचत  करायची असेल, तर तुम्ही बजेटिंगकडे (budgeting) लक्ष देणे गरजेचे आहे. याच बजेटिंगच्या सवयीमुळे आपण किती पैसे खर्च करतो आणि किती पैशाची बचत करू शकतो, हे लक्षात येते. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त बचत करू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स, जाणून घेऊयात.

गोल्डन रेशो (Golden ratio)

बजेटिंग करताना गोल्डन रेशो हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. या अंतर्गत लोक स्वतःच्या बजेटला भूतकाळ, भविष्य आणि वर्तमानात विभागतात आणि त्यावरून खर्चाचा अंदाज लावून बचत करतात. यामध्ये खर्चाची नोंद केली जाते. या नोंदीवरून अतिरिक्त खर्च लक्षात येतो.

एखाद्या गोष्टीवर खर्च करताना किती पैसे आपण यापूर्वी खर्च केले, उर्वरित किती पैसे सध्या खर्च करायला हवेत आणि किती रक्कम भविष्यासाठी राखून ठेवायला हवी, हे गोल्डन फॉर्म्युला शिकवतो. यामुळे बजेटिंग करणे सोपे जाते. या फॉर्म्युलाचे गुणोत्तर हे भूतकाळातील गोष्टींसाठी 20% खर्च, वर्तमानासाठी 60% खर्च, तर भविष्यासाठी 20% खर्चाच्या रकमेची तरतूद केली जाते.

जेवढा खर्च तेवढीच बचत (Save as much as you spend)

बचत आणि खर्च हे हातात हात घालून चालत असतात. त्यामुळे खर्च करताना बचतीचा  विचार करायला हवा. तुम्ही जेवढा खर्च कराल, तेवढी बचत करायला शिकले पाहिजे. तुमचे मासिक उत्पन्न लक्षात घेऊन तुम्ही एका आठवड्यात जर 5000 रुपये खर्च केले, तर साप्ताहिक बचत निधीमध्ये 5000 रुपयांची बचत करायला हवी. जेवढा खर्च कराल, तेवढीच बचत केली, तर जास्तीत जास्त पैसे साठवू शकता.

विचार करून खरेदी करा (Buy with thought)

सध्या आपण मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन शॉपिंग करत आहोत. बऱ्याच वेळा थेट बाजारातील खरेदीपेक्षा आपल्याला ऑनलाईन खरेदी केलेली वस्तू स्वस्त मिळते. त्यामुळे अनेकजण ऑनलाईन शॉपिंग मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र ही शॉपिंग करताना आपण किती पैसे खर्च करतो, हे लक्षात येत नाही.

त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करण्यापूर्वी  तुम्हाला एखादी वस्तू आवडली, तर तिला कार्टमध्ये ठेवायला शिका. किमान 2 आठवडे ते एक महिना त्या वस्तूला तसेच कार्टमध्ये राहू द्या. जर एका महिन्यानंतर देखील तुम्हाला त्या वस्तूची खरचं गरज असेल, तर तुम्ही तिला खरेदी करू शकता.

छोट्या गुंतवणुकीला प्राधान्य द्या (Prefer small investments)

पैशाची बचत करण्यासोबत त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे देखील गरजेचे आहे. बऱ्याच वेळा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैशाची आवश्यकता असते. अशा वेळी दीर्घ काळासाठी केलेली गुंतवणूक तोट्याची ठरू शकते. त्यामुळे छोट्या गुंतवणुकीला प्राधान्य द्या.

काही आठवड्यासाठी, महिन्यांसाठी, किंवा एका वर्षासाठी गुंतवणूक करायला शिका. या गुंतवणुकीतून तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू किंवा गरजा पूर्ण करू शकता. अशा गुंतवणुकीमुळे दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीला हात लावला जात नाही.

कॅशचा वापर वाढवा (Increase cash utilization)

हल्ली 1- 2 रुपयांचे व्यवहार देखील ऑनलाईन (online) केले जातात. त्यामुळे आपण नेमके किती पैसे खर्च करतो, याची कल्पना आपल्याला नसते. महिन्यापाठी आपले बँक अकाउंट आपल्याला खाली झालेले पाहायला मिळते. त्यामुळे कॅशचा वापर वाढवा. कॅश खर्च करताना आपल्याला आपण किती पैसे खर्च करतो याचा अंदाज येतो. त्यामुळे  खर्चावर नियंत्रण मिळवता येते.

Source: zeebiz.com