Money Management Tips: बरेच जण खूप पैसा कमवतात आणि मोकळ्या हाताने खर्च देखील करतात. त्यामुळे वेळेवर पैशांची गरज भासल्यास, त्यांना पैसे कर्जाने काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे आधीच पैशांचे मॅनेजमेंट केले तर त्यांना या प्रसंगाला सामोर जायची गरज भासत नाही. यासाठी तुमची कमाई आणि खर्चांचा मेळ बसवणे आवश्यक असते.
तेव्हाच तुमची काहीतरी बचत होऊ शकते. तसेच, भविष्यातील आर्थिक अडचीणींवर मात देता येऊ शकते. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी 50-30-20 चा फाॅर्म्यूला घेऊन आलो आहोत.
हा फॉर्म्यूला आहे बेस्ट
कोणतीही गोष्ट करायची म्हटल्यावर मॅनेजमेंट आवश्यक आहे. मात्र, आपण पैशांच्या ठिकाणीच ती गोष्ट लागू करत नाही. त्यामुळे आर्थिक बाबी हाताळताना त्रास होतो. पण, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही तुमच्या कमाईला 50-30-20 च्या फाॅर्म्यूल्यात एकदम परफेक्ट फिट केल्यास, तुमचे भविष्य सुरक्षित व्हायला मदत होणार आहे. यासाठी फक्त तुम्हाला या फाॅर्म्यूल्यानुसार प्लॅन करणे गरजेचे आहे.
यासाठी तुमच्या कमाईतला एक मोठा हिस्सा 50 टक्के तुम्ही कर्जाची परतफेड, भाडे, किराणा आणि वीज बिल आणि अशाच इतर गोष्टींसाठी बाजूला काढून ठेवा. यानंतर तुमच्या कमाईचा 30 टक्के हिस्सा महत्वाच्या वस्तू आणि सेवांसाठी वापरा. तसेच, जो 20 टक्के उरेल, त्याची बचत करणे सुरू करा. त्यामुळे भविष्यातल्या महत्वाच्या कामासाठी तो तुम्हाला उपयोगी येऊ शकतो.
असा होईल खर्च
हा फाॅर्म्यूला कसा अप्लाय करायचा हे आपण थोडक्यात समजून घेऊया. समजा तुम्ही 60000 रुपये महिन्याला कमवता. 60 हजाराचे 50 टक्के म्हणजे 30 हजार रुपये, तुम्ही या रकमेद्वारे घरासंबंधित खर्च आणि कर्ज असेल तर ते फेडू शकता. त्यांनतर 30 टक्के म्हणजेच 18 हजार रुपये तुम्ही महत्वाच्या वस्तू आणि सेवांसाठी खर्च करु शकता. त्यानंतर उरलेले 20 टक्के 12 हजार रुपये हे तुम्हाला बचत करणे आवश्यक आहेत.
याशिवाय तुमच्यावर कर्ज नसेल किंवा काही छंद नसेल. तर तो उरलेला पैसा ही तुम्ही बचत करु शकता. यामुळे वर्षाला तुमच्याजवळ एक मोठी रक्कम जमा व्हायला मदत होईल. त्यानंतर हीच रक्कम तुम्ही इतर ठिकाणी गुंतवणूक करुन त्यातून ही चांगला रिटर्न मिळवू शकता. फक्त ते गुंतवण्याआधी तुम्हाला मार्केटविषयी रिसर्च करणे गरजेचे असणार आहे. तेव्हाच गुंतवणूक करणे योग्य ठरु शकते.