तुम्ही Provident Fund मध्ये पैसे गुंतवले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. याचे कारण म्हणजे EPFO , कर्मचारी भविष्य निधी संस्थेने एक्स्चेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) मधून मिळालेले पैसे स्टॉक मार्केटमध्ये म्हणजेच शेयर बाजारात गुंतवणार आहे. याबाबत EPFO ने निर्णय घेतला असून केवळ अर्थ व कामगार मंत्रालयाच्या मंजुरीची ते वाट पाहत आहेत.
येत्या काही दिवसांत अर्थ मंत्रालयाकडून आणि कामगार मंत्रालयाचकडून यावर सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे. या निर्णयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी असून लवकरच सर्व गुंतवणूकदारांना याबाबत कळवले जाणार आहे,.
इक्विटी रिटर्न वाढतील
कर्मचारी भविष्य निधी संस्थेने त्यांच्या मार्च महिन्यातील बैठकीत याबाबत निर्णय घेतला होता. सध्याची मार्केटची एकूण परिस्थिती बघता शेयर मार्केटमध्ये एक्स्चेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) मधून मिळालेले पैसे गुंतवल्याने चांगले इक्विटी रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.
EPFO त्यांच्या खातेदारांनी गुंतवलेली रक्कम वेगवगेळ्या योजनांमध्ये गुंतवत असते आणि त्या योजनेतून मिळालेला परतावा खातेदारांना दरवर्षी दिला जातो. तसेच कर्मचाऱ्यांना अडीअडचणीला पैशाची गरज भासल्यास ते त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. याशिवाय सेवानिवृत्तीनंतर आर्थिक शिस्तीत पीएफमध्ये केलेली गुंतवणूक कर्मचाऱ्यांना चांगला परतावा देणारी योजना ठरली आहे.
किती गुंतवणूक करता येणार?
अर्थ मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, EPFO त्याच्या उत्पन्नाच्या 5% ते 15% रक्कम इक्विटी फंडात आणि इतर योजनांमध्ये गुंतवू शकते. त्यापेक्षा अधिक रक्कम त्यांना गुंतवता येत नाही. यामुळे शेयर मार्केटचा आणि एकूण देशातील आर्थिक चढाओढीचा परिणाम गुंतवणूकदारांच्या परताव्यावर जाणवत नाही.
असे असले तरी गेल्या एकाही वर्षांपासून एक्स्चेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) मधील पैसे गुंतवण्याचे नियम बदलले जावेत अशी EPFO मागणी करत आहे. अजून वित्त आणि कामगार मंत्रालयाने गुंतवणुकीच्या या मर्यादेवर कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे EPFO त्याच्या उत्पन्नाच्या 5% ते 15% रक्कमच शेयर बाजारात लावणार आहे.