Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan Scheme: घर खरेदी करण्याचा विचार आहे? सरकार आणणार 60 हजार कोटी रुपयांची योजना, ‘या’ लोकांना मिळेल फायदा

Home Loan Scheme

Image Source : https://www.freepik.com/

मोदी सरकार तब्बल 60 हजार कोटी रुपयांची गृह कर्ज सबसीडी योजना सुरू करणार आहे. शहरी भागात राहणाऱ्या लाखो लोकांना या योजनेचा फायदा मिळेल.

प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारकडून देखील प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकारकडून सातत्याने नवनवीन योजनेची घोषणा केली जात आहे. लवकरच मोदी सरकार तब्बल 60 हजार कोटी रुपयांची गृह कर्ज सबसीडी योजना सुरू करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर खरेदी करता यावे यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करण्याचा सरकारचा उद्देश आहे. कोणत्या नागरिकांना घर खरेदी करण्यासाठी या योजनेचा फायदा होऊ शकतो, याविषयी जाणून घेऊया. 

सरकारची घर खरेदीसाठी नवीन गृह कर्ज सबसीडी योजना

केंद्र सरकार पुढील काही महिन्यात या नवीन गृह कर्ज सबसीडी योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. पुढील काही महिन्यात होणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका व पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या तोंडावर सरकार ही घोषणा करण्याची शक्यता आहे. 

60 हजार कोटींची ही नवीन गृह कर्ज सबसीडी योजना 5 वर्षांसाठी राबवली जाईल. या योजनेंतर्गत घर खरेदीसाठी 3 ते 6.5 टक्के व्याजदराने  9 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. तसेच, 20 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांचे कर्ज देखील मिळेल. स्मॉल अर्बन हाउसिंगवर हे कर्ज दिले जाईल. 

या लोकांना मिळेल या योजनेचा फायदा

सरकारच्या या नवीन योजनेचा लाभ शहरी भागात राहणाऱ्या गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबांना होईल. जवळपास 25 लाख लाख अर्जदार या योजनेचा फायदा घेण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात प्रमुख बँकांच्या माध्यमातून हे कर्ज उपलब्ध केले जाईल. वर्ष 2028 पर्यंत लाखो लोकं या योजनेच्या फायदा घेऊन घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील. 

अद्याप या योजनेची रुपरेषा ठरविण्यात आली नसली तरी प्रामुख्याने शहरी व ग्रामीण भागातील कमी उत्पन्न असणारे नागरिक योजनेचा फायदा घेऊ शकतील. तसेच, यासाठी ठराविक कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास आधीपासूनच पात्रता तपासून कागदपत्रे तयार ठेवा, जेणेकरून भविष्यात याचा फायदा घेईल.

घर खरेदीसाठी सरकारच्या इतर योजना

सर्वसामान्यांना घर खरेदी करता यावे यासाठी सरकारकडून इतरही योजना राबवल्या जातात. यापैकीच एक योजना पंतप्रधान आवाज योजना-अर्बन (PMAY-U) ही आहे. सरकारद्वारे ही योजना 2015 ते 2022 या कालावधीपर्यंत राबवण्यात आली. या योजनेचा कालावधी वर्ष 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. आता सरकारची नवीन गृह कर्ज सबसीडी योजना या जुन्या योजनेची जागा घेण्याची शक्यता आहे. याशिवाय, या नवीन योजनेमुळे जास्तीत जास्त लोकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.