मोबाईल वॉलेट्स आणि UPI अर्थात ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’चा वापर झपाट्याने वाढला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या CoviD-19 काळामध्ये इलेक्ट्रॉनिक व्यवहार अधिक वेगाने वाढले. UPI चे व्यवहार वाढत गेले आणि मोबाईल ट्रान्झॅक्शन संबंधीचे फसवणुकीचे व्यवहार अधिकाधिक नवनवीन रूपाने आणि वेगाने समोर येऊ लागले. अर्थात “डिजिटल-युगातील” या सर्व सोयीसुविधा आणत असताना, एकूणच इलेक्ट्रॉनिक बँकिंग सिस्टम ही सायबर फसवणुकीसाठी “सॉफ्ट टार्गेट” बनली आहे. तेव्हा ही सायबर-रिस्क तुलनेने कमी करण्यासाठी, नाविन्यपूर्ण उपाय उपलब्ध करून देणारी मोबाईल ट्रान्झॅक्शन इन्शुरन्स स्कीम One97 Communications (OCL) या कंपनीने “पेटीएम पेमेंट प्रोटेक्ट” (Paytm Payment Protect) या नावाने नुकतीच लॉन्च केली आहे. यामुळे सर्व पेमेंट वॉलेट्स आणि ॲप्सच्या सहाय्याने केलेल्या व्यवहारांना आर्थिकदृष्टया सुरक्षित केले आहे.
अवघ्या 30 रुपयांत पेमेंट प्रोटेक्ट इन्शुरन्स
Paytm या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी असणाऱ्या One97 Communications (OCL) ने हा “Paytm Payment Protect” प्लॅन HDFC ERGO जनरल इन्शुरन्सच्या सहकार्याने सुरू केला आहे. सर्व ॲप्स आणि वॉलेट्सवर युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (Unifies Payments Interface-UPI) द्वारे केलेल्या व्यवहारांचा विमा काढण्यासाठी हा प्लॅन डिजाईन करण्यात आलेला आहे. ह्या योजनेमुळे लोकांचा डिजिटल पेमेंटचा अनुभव वाढण्यासाठी उपयोग होईल, असा कंपनीचा दावा आहे. ही इन्शुरन्स कव्हरची ऑफर दर वर्षी 30/- रुपये इतक्या अत्यल्प किमतीत येते. तेव्हा UPI युजर्स आता या नवीन इन्शुरन्स स्कीममुळे 10,000 रुपयांपर्यंतच्या मोबाईल संबंधी होणाऱ्या फसव्या व्यवहारांपासून (Cyber Frauds) स्वतःला सुरक्षित ठेवण्यास सक्षम असतील. लवकरच प्रतिवर्षी 1 लाख रुपयांपर्यंत कव्हर करण्याचे पर्याय लवकरच या इन्शुरन्स प्रॉडक्ट सोबत जोडण्यात येणार आहेत.
या योजनेचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे UPI ची असलेली इंटर-ऑपरेबिलिटी. त्यामुळे जरी वापरकर्ता (युझर) Paytm कडे रजिस्टर्ड नसला, तरीदेखील सर्व UPI पेमेंट ॲप्सवर, कोणत्याही मोबाईल नंबरवर UPI व्यवहार शक्य असतील. त्यामुळे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि मोबाईल पेमेंट्सला जास्तीत जास्त चालना मिळू शकेल.
One 97 Communicationsचा पेटीएम पेमेंट प्रोटेक्ट प्लॅन
Paytm हा One97 कम्युनिकेशन्सचा प्रमुख ब्रँड असून, भारतातील डिजिटल प्रॉडक्ट्स आणि मोबाइल कॉमर्ससाठी सर्वात मोठे व्यासपीठ आहे. रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंजूर केलेल्या सेमी-क्लोज्ड वॉलेटद्वारे ई-कॉमर्स व्यापार्यांना पेमेंट सोल्यूशन्स पुरवणारी ही एक आघाडीची कंपनी आहे. तेव्हा Paytm च्या डिजिटल प्रवेशासह ही “बाईट-साईझ्ड इन्शुरन्स” ऑफर डिजिटल व्यवहारांना चालना तर देईल आणि सोबत सुरक्षित डिजिटल पेमेंटचा अवलंब केल्याने देशातील सायबर फसवणूक नियंत्रणामध्ये आणण्यास मदत होऊ शकेल, असे कंपनी कडून सांगण्यात आले आहे.
कस्टमर्स त्यांचे भविष्यातील सर्व डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठी खाली नमूद केलेल्या सोप्या स्टेप्स-मध्ये ‘पेमेंट प्रोटेक्ट’ मिळवू शकतात.
पेटीएम ॲपवर ‘पेमेंट प्रोटेक्ट’ शोधावा
- कस्ट्मरचे नाव, मोबाईल नंबर एंटर करावा आणि “पेमेंट करण्यासाठी पुढे जा” वर करावी.
- पेमेंट होताच तुमचे इन्शुरन्स कव्हर चालू होते. पेमेंट प्रोटेक्ट प्लॅन अंतर्गत एक वर्षासाठी कव्हरेज मिळतो.
- अधिक माहिती, अटी जाणून घेण्यासाठी https://www.hdfcergo.com/download/policy-wordings या लिंकवर वाचा.