Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Modification: मिरे अ‍ॅसेटने सुरु केली 'एसआयपी'मध्ये बदल करण्याची सुविधा, गुंतवणूकदारांना मिळणार आता 'या' सुविधा

SIP

SIP Modification:एसआयसी मॉडिफिकेशन सुविधेमुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीत काही बदल करायचे असल्यास त्यांना विद्यमान सुरु असलेली मूळ एसआयसी योजना बंद करण्याची आवश्यकता नाही.

म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक (SIP) करण्याची सुविधा आहे. मात्र एकदा एसआयपी सुरु केली की त्यामध्ये सहसा लगेच बदल करता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीपर्यंत ती गुंतवणूक सुरु ठेवावी लागते. मात्र या सुविधेमध्ये देखील बदल करण्याचा पर्याय मिरे अ‍ॅसेट म्युच्युअल फंड कंपनीने उपलब्ध केला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना एसआयपीमध्ये गुंतवणुकीसंदर्भात काही महत्वाचे बदल करण्याचा चॉईस मिळेल.

‘एसआयपी’मध्ये बदल करण्याच्या सुविधेत (SIP Modification) गुंतवणूकदाराला एसआयपीतील गुंतवणूक हप्ता तारिख बदलणे, त्याची वारंवारता, SIP रक्कम अशा गोष्टींमध्ये बदल करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. ही नवीन सुविधा आज सोमवार 19 जून 2023 पासून लागू झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

एसआयसी मॉडिफिकेशन सुविधेमुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीत काही बदल करायचे असल्यास त्यांना विद्यमान सुरु असलेली मूळ एसआयसी योजना बंद करण्याची आवश्यकता नाही. जर गुंतवणूकदाराना काही बदल करायचे असल्यास मूळ एसआयपी योजना गोठवून त्याच फोलिओ नंबरवर सुधारित योजना पुढे सुरु ठेवता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने योजनेच्या माहिती पत्रकात या संदर्भात परिशिष्ट जोडले आहे. ज्यात गुंतवणूकदाराला एसआयसीत बदल करता येईल. या व्यक्तिरिक्त म्युच्युअल फंड योजनेतील उर्वरित अटी आणि शर्थी कायम राहतील, असे कंपनीने म्हटले आहे.

मे महिनाअखेर सर्वच म्युच्युअल फंड कंपन्यांकडील एसआयपी गुंतवणूक 7.52 लाख कोटींपर्यंत वाढली असल्याचे  असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (AMFI) म्हटले आहे. मे 2023 अखेर 6 कोटी 52 लाख एसआयपी अकाउंट सक्रियपणे सुरु आहेत. 

SIP मधून दर महिन्याला होतेय प्रचंड गुंतवणूक

  • म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून प्रचंड गुंतवणूक होत आहे. 
  • म्युच्युअल फंड कंपन्यांची शिखर संस्था असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) आकडेवारीनुसार मे महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून तब्बल 14749 कोटींची गुंतवणूक झाली. 
  • आजवरची एका महिन्यात एसआयपीमधून झालेली ही विक्रमी गुंतवणूक आहे. 
  • यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये फंड कंपन्यांना एसआयपीमधून 13728 कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली होती. 
  • एसआयपी गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड आणि पर्यायाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सोपा मार्ग आहे. त्यामुळे एसआयपी गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.