Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MG India ची नवीन MG Astor SUV लवकरच होणार लाँच!

MG Astor SUV

Image Source : www.cardekho.com

New MG Astor SUV: MG India लवकरच नवीन फीचर्ससह आपले कॉम्पॅक्ट MG Astor SUV मॉडेल बाजारात आणू शकते. MG Astor SUV मॉडेल हे SUV श्रेणीमधील सर्वात प्रगत मॉडेल असल्याचा दावा MG India कंपनीने केला आहे. याआधी कंपनीने Astor SUV भारतात 2011 मध्ये पहिल्यांदा लाँच केली होती.

New MG Astor SUV Will Be Launched Soon: जानेवारी 2023 मध्ये व्होल्वोने आपले इलेक्ट्रॉनिक एसयूव्ही मॉडेल मार्केटमध्ये लाँच केल्यानंतर जवळपास सर्वच फोर व्हीलर कंपन्यांनी आपआपले SUV मॉडेल मार्केटमध्ये लाँच केलेत. त्यामुळे मार्केटमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. नवीन SUV मॉडेल लाँच करणारी प्रत्येक फोर व्हीलर कंपनी, दुसऱ्या कंपनीच्या  SUV मॉडेलपेक्षा काहीतरी नवीन-अपडेटेड फिचर देण्याचा प्रयत्न करीत  असते. त्याचप्रमाणे MG Astor SUV मॉडेल हे  SUV  श्रेणीमधील सर्वात प्रगत मॉडेल असल्याचा दावा MG India कंपनीने केला आहे. यामुळे ग्राहकांना टेक्नॉलॉजी आणि लक्झरीचा अनुभव दोन्ही एकाच जागी मिळणार आहे.

कंपनीचे MG Astor SUV मॉडेल आधीच बाजारात उपलब्ध असतांना, परत नवीन वैशिष्ट्यांसह SUV मॉडेल बाजारात आणणारी MG India ही पहिली कंपनी आहे. Astor SUV भारतात 2011 मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. भारतात अ‍ॅ डव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) फिचर ऑफर करणारी ही तिच्या श्रेणीतील पहिली SUV होती.

अपडेटेड फिचर्स कोणते?

इंटेलिजेंट टर्न इंडिकेटर, लार्ज टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, इंस्ट्रुमेंट क्लस्टर ओपन नवीन सॉफ्टवेअर ग्राफिक्स आणि पॉवर्ड टेलगेट, ऑटो कार लॉक-अनलॉक, व्हॉईस कमांडसह आठ-रंगांची सभोवतालची प्रकाशयोजना यासारखी फीचर्स दिली जाऊ शकतात.

आधीच्या SUV ची वैशिष्ट्ये आणि फिचर कोणते

कंपनी नवीन फीचर्ससह MG Astor SUV पुन्हा लाँच करण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे, आधीच्या MG Astor SUV ची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. MG Aster SUV साठी ग्राहकाला 10 लाख 81 हजार रुपये खर्च करावे लागतात. MG Astor SUV ची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन कंपनीने 6 एअर बॅग दिल्या आहेत. इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. कंपनीने MG Astor SUV मध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे सुमारे 108bhp ते 144Nm पॉवर जनरेट करण्याची क्षमता ठेवते. तर  1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये 138bhp आणि 220Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

मार्केटमधील SUV मॉडेल कोणकोणते

बाजारात आधीच Tata Punch SUV,  Lamborghini Urus S, Maruti Suzuki Jimny SUV,  Volvo Bron Electric SUV C40 Recharge,  Mahindra SUV XUV400,  Kie EV6 SUV,  Hyundai Ioniq 5 Electric SUV यासारख्या अनेक गाड्या स्पर्धेत आहे.