Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MG Comet EV booking : इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेटच्या बुकिंगला सुरुवात, मे अखेर डिलिव्हरी!

MG Comet EV booking : इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेटच्या बुकिंगला सुरुवात, मे अखेर डिलिव्हरी!

MG Comet EV booking : इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेटच्या बुकिंगला सुरुवात झालीय. कंपनीनं जाहीर केल्याप्रमाणं 15 मेपासून हे बुकिंग सुरू होणार होतं. आता बुकिंग सुरू झालं असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही कार डिलिव्हर केली जाणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणि वापर वाढताना दिसून येत आहे. विविध कंपन्या स्टार्टअप्स इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहेत. सरकारही अशी वाहननिर्माता कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे. त्याततील एक कंपनी म्हणजे एमजी मोटर. एमजी मोटरतर्फे कॉमेट ही इलेक्ट्रिक कार तयार केली जाते. ग्राहकांच्या गरजांना समोर ठेवून या कारची निर्मिती करण्यात आलीय. ग्राहकांना परवडणारी अशी इलेक्ट्रिक कार ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे खरेदी करता येईल. हे एक स्मार्ट ईव्ही वाहन आहे.

वितरण प्रक्रिया असणार पारदर्शक 

एमजी मोटर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट mgmotor.co.inवर जाऊन ग्राहक एमजी कॉमेट कार बुक करू शकतात किंवा तुम्ही एमजीच्या डीलरशिपला भेट देऊन ग्राकांना ऑफलाइन ई-कार बुक करता येईल. टोकनची किंमत कंपनीनं 11,000 रुपये निश्चित केलीय. सुमारे आठवडाभरानंतर म्हणजेच या महिनाभराअखेर गाडीची डिलिव्हरी सुरू होईल. वितरण प्रक्रिया (Distribution process) पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी कंपनीनं विशेष व्यवस्था केलीय. वितरण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एमजीनं प्रथमच ट्रॅक आणि ट्रेस वैशिष्ट्य सादर केले आहे. माय एमजी (MyMG) अ‍ॅपमध्ये सर्व अद्ययावत प्रणाली असणार आहे. यात समाविष्ट केलेल्या ट्रॅक आणि ट्रेस फीचर्सच्या मदतीनं ग्राहक एमजी कॉमेट ईव्हीच्या बुकिंगपासून डिलिव्हरीपर्यंतचे सर्व डिटेल्स, रिअल-टाइम अपडेट्स सहज मिळवू शकतात. हे फीचर ग्राहकांना त्यांच्या फोनवरून त्यांच्या कार बुकिंगची एकूणच सर्व स्थिती सांगतं.

विविध टप्प्यांत डिलिव्हरी

एमजी कॉमेट ईव्ही भारतीय बाजारपेठेत पेस (Pace), प्ले (Play) आणि प्लश (Plush) या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 7.98 लाख रुपयांपासून सुरू होते. कॉमेट ईव्हीची पेस व्हेरिएंट 7.98 लाख रुपयाच्या (एक्स-शोरूम) किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. दुसरीकडे, ग्राहक प्ले व्हेरिएंट 9.28 लाख रुपयांना आणि प्लश व्हेरिएंट 9.98 लाख रुपयांना (एक्स-शोरूम) खरेदी करू शकतात. अत्यंत कमी किंमतीत कॉमेटची उपलब्धता मर्यादित आहे. पहिल्या 5,000 ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना कंपनी आपली खास ऑफर देणार आहे. कंपनी मे महिन्यापासून म्हणजेच मेच्या शेवटच्या आठवड्यापासून कॉमेट ईव्हीची डिलिव्हरी सुरू करेल. तर नवीन इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी विविध टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.

टेक्निकल फीचर्स

मागच्या महिन्यात 19 एप्रिलला भारतीय बाजारात एमजी कॉमेट लॉन्च झाली. या कारमध्ये 17.3 kWhची लिथियम-आयन बॅटरी आहे. ही नवीकोरी ई-कार एका चार्जवर 230 किलोमीटरची रेंज देणार आहे. यात सिंगल इलेक्ट्रिक मोटर आहे. 42 बीएचपी पॉवर आणि 110 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. नियमित एसी (AC) चार्जर वापरून मिनी कॉमेट ईव्ही (Mini Comet EV) 7 तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. यामध्ये डीसी (DC) फास्ट चार्जिंगला मात्र सपोर्ट नाही.

किंमत काय?

एमजी मोटरच्या नवीन कॉमेट ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 7.98 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनी लवकरच व्हेरिएंटच्या आधारे किंमती जाहीर करणार आहे. नव्या ई-कारच्या टॉप व्हेरियंटची किंमत सुमारे 10 लाख रुपये असेल, अशी अपेक्षा आहे. या मिनी इलेक्ट्रिक कारची बाजारात उपलब्ध असलेल्या टाटा टिएगो (Tata Tiago EV), टिगोर ईव्ही (Tigor EV) आणि सिट्रोन ईसी 3 (Citroen eC3) यांच्यासोबत स्पर्धा असणार आहे.