Comet EV Run 1000 Km In Rs 519 : MG Motor India ने त्यांची स्मार्ट इलेक्ट्रिक कार MG Comet EV लाँच केली आहे. MG Motor India ने ही EV 7,98,000 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह लाँच केली आहे. ही या कारची प्रास्ताविक किंमत आहे. शहरांमध्ये वाढत चाललेली गर्दी, कार प्रेमींची संख्या आणि पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने MG ने ही कार मार्केटमध्ये आणल्याचं म्हटल्या जात आहे.
Table of contents [Show]
वैशिष्टयपूर्ण रचना
MG Comet EV चे डिझाईन अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. MG Motor India BICO-'बिग इनसाइड, कॉम्पॅक्ट आऊटसाइड' या संकल्पनेसह कारची रचना केली आहे. याचा अर्थ कार आतून मोठी असली तरी बाहेरून कॉम्पॅक्ट (लहान)दिसते. कॉम्पॅक्ट डिझाईनसह येणार्या कॉमेट ईव्हीला खूप चांगली लेग स्पेस आणि हेडरूम मिळेल, असेच डिझाईन साकारण्यात आले आहे.
MG Motor च्या कल्पक्तेचा अनुभव
एमजी (MG Motor India) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखले जाते. या कारमध्येही कंपनीची कलपक्ता आणि अद्यावत इलेक्ट्रिक तंत्रज्ञान दिसुन येते. ग्राहकांना इन-बिल्ट iSmart सिस्टममध्ये 55 पेक्षा जास्त कनेक्टेड कार वैशिष्ट्ये देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला 10.25 इंच डिजिटल क्लस्टर मिळेल. याशिवाय Comet ईव्हीमध्ये बसवण्यात आलेली मनोरंजन यंत्रणा अनेक स्मार्ट फीचर्सने सुसज्ज आहे. तसेच या वाहनाची Smart Key देखील अतिशय आकर्षक आहे.
519 रुपयांत 1,000 किलोमीटरपर्यंत धावते
कॉमेटमध्ये 230 किलोमीटरची प्रमाणित बॅटरी रेंज मिळते. म्हणजेच एकदा चार्ज करून तुम्ही 230 किलोमीटरपर्यंत धावू शकता. कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे पार्क करणे,गाडी वळवणे आणि यू-टर्न घेणे सोपे होते. विशेषत: शहरातील गर्दी आणि प्रवाशांना लक्षात घेऊन या गाडीची रचना करण्यात आली आहे. MG कंपनीचा दावा आहे की, Comet EV मध्ये 519 रुपये चार्जिंग खर्चासह ग्राहक 1,000 किलोमीटरपर्यंत गाडी चालवु शकतो.
15 मे पासून बुकिंग सुरू
कंपनीने माहिती दिली आहे की, लोक 27 एप्रिलपासून नवीन MG Comet EV ची चाचणी ड्राइव्ह घेऊ शकतात. नवीन Comet EV चे बुकिंग 15 मे पासून सुरू होईल. या गाडीची किंमत 7,98,000 रुपये एक्स-शोरूम आहे.