Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Meta annual recap 2022: सर्वात खराब काम करणारी कंपीन 'मेटा'

Metas stock crashed & lost revenue in the year 2022

Meta performed worst this year: भारतातील सर्वात लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबूक, त्याची मूळ कंपनी मेटाने 2022 वर्षात खूप मोठे नुकसान सोसले आहे. नेमकी किती घट झाली आणि कशामुळे झाली ते या लेखातून जाणून घ्या.

Meta's earnings have slumped this year: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने  2022 वर्षात महसुलात घट नोंदवली आहे. फोर्ब्स 2022 ने आपल्या अहवालात मेटाला वर्षभरात व्यवसायात सर्वात वाईट कामगिरी करणारी कंपनी असे लेबल दिले आहे. मेटाचे शेअर या संपूर्ण वर्षात 60 टक्क्यांनी पडले तर महसूलात 13 टक्क्यांची घट झाली यामुळे कंपनीचे एकूण 237 अब्ज युएस डॉलरचे नुकसान झाले आहे, ही माहिती मेटाच्या वार्षिक अहवालात नमूद केलेली आहे.

debit-credit-2022-8.png

कमाईतील ही घसरण मुख्यतः मेटाव्हर्स (Metaverse) मधील मेटाच्या (Meta) मोठ्या गुंतवणुकीमुळे आहे. मेटाच्या आभासी वास्तविकता विभाग, रिअॅलिटी लॅब आदी गोष्टींमध्ये 3.672 अब्ज गुंतवले आहेत, अशी सारवासारवही सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्याकडून अहवालातील एका प्रकरणात करण्यात आली आहे.

या वर्षात मेटाचे नुकसान का झाले? Why did meta lose this year?

एक वर्षापूर्वी मार्ग झुकेरबर्गने आभासी वास्तवाला चालना देण्यासाठी मेटाची (Meta) स्थापना केली. पण आता कंपनीच्या शेअरची किंमतही घसरली आहे, महसूल कमी होत आहे आणि नफाही कमी होत आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठीही धोक्याची घंटा वाजली आहे. कंपनीला पहिल्या तिमाहीत फारसा महसूल मिळवता आला नाही. त्याचवेळी झुकेरबर्गने या आव्हानाला सामोरे जाण्याबाबत बोलले आहे.

मेटाच्या प्रमुख गुंतवणुकदारांनी 2022 मधील गुंतवणूक 42 टक्क्यांनी कमी केली आहे. तसेच नव्या गुंतवणुकदारांनी पाठ फिरवली. यामुळे मेटाला या वर्षात खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. भारत वगळता इतर देशातील फेसबूक युजरची अॅक्टीव्हिटी घटली आहे, यामुळे या वर्षात जाहिरातदार 38 टक्क्यांनी घटले आहेत.मेटाव्हर्सच्या एआर विभागाने 10 अब्ज युएस डॉलर पाण्यात बुडवले, त्यांचे नवे तंत्रज्ञान पूर्णपणे अयशस्वी ठरले.  मेटाने व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रॅम आणि फेसबूक इंडियाच्या माध्यमातून यंदा कमाई केली आहे.

यंदाच्या वर्षात फेसबुकवरील मासिक सक्रिय युजरची दोन टक्क्यांनी वाढली आहे. हा दर जवळपास 77 टक्क्यांनी घटला आहे. याचा अर्थ 2.96 अब्ज युजर आहेत. तसेच, कर्मचाऱ्यांना हटवले असले तरी नंतरच्या काळात कंपनीतील कर्मचार्‍यांची संख्या 87 हजार 314 पर्यंत वाढली आहे. याचाच अर्थ वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या संख्येत 28 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी ही नोकरभरती करण्यात आल्याचे मेटाने अहवालात स्पष्ट केले आहे. मेटाने कर्मचाऱ्यांना कामावरुन हटवले होते त्यावेळी त्यांचे शेअर झपाट्याने पडले होते.

सध्या नवीन प्रयोगांसह, काही व्यवस्थापनात बदल करून पुन्हा फेसबुकला सोशल मिडियाच्या स्पर्धेत अव्वल ठरवण्याचे आव्हान मार्क झुकेर्बग यांनी घेतले आहे.