Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Metaverse Bank: बँकिंग क्षेत्राचं भविष्य...अनुभवा मेटाव्हर्सची दुनिया

what is metaverse banking

येत्या काळात बँकिंग व्यवहार मेटाव्हर्सद्वारे सुद्धा होऊ शकतील. घरी बसल्या तुम्ही बँकेत असल्याचा अनुभव व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे घेऊ शकता. या मेटाव्हर्स बँकेतील Metaverse Bank आभासी कर्मचारी किंवा मॅनेजर तुम्हाला मदतीसाठी तत्पर असतील.

प्रत्येक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत आहेत. तंत्रज्ञानाची जोड असल्याशिवाय हे शक्य नाही. पैशांचे व्यवहार करण्यासाठी बँकेत जाऊन लेजरबुकमध्ये एंट्री करण्यापासून ते ऑनलाईन ट्रॅझॅक्शन करण्यापर्यंतचा प्रवास तर तुम्ही पाहतच आहात. मात्र, येत्या काळात बँकिंग व्यवहार मेटाव्हर्सद्वारे सुद्धा होऊ शकतील. घरी बसल्या तुम्ही बँकेत असल्याचा अनुभव व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे घेऊ शकता. या मेटाव्हर्स बँकेतील Metaverse Bank आभासी कर्मचारी किंवा मॅनेजर तुम्हाला मदतीसाठी तत्पर असतील.

सध्या तुम्ही बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकींग अॅप किंवा वेबसाइट वापरता. या साइटवर लॉग इन होऊन तुम्ही माहिती वाचून व्यवहार करता. त्यास (रिड अँड राईट) मोड असे म्हटले जाते. मात्र, मेटाव्हर्समध्ये तुम्ही स्वत: बँकेत उपस्थित असल्याचा व्हिज्युअली अनुभव घेऊ शकता. यासाठी तुम्हाला व्हिआर गॉगल्स, हेडसेट आणि स्क्रीनची गरज पडेल.

हा एक संपूर्ण डिजिटल अनुभव असेल. अनेक बँकांनी हा मेटाव्हर्सचा अनुभव कसा असेल यासाठी डेमो तयार केले आहेत. मेटाव्हर्समध्ये बँकेचे व्यवहार करताना तुम्ही बोलूही शकता. त्यासाठी मशिन जनरेटेड मात्र, अगदी व्यक्तीच्या आवाजासारखे मॉडेल्स तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये भावनांचाही समावेश असेल.

व्हर्च्युअल अवतार साधतील एकमेकांशी संवाद (virtual avatar)

डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकींग टेक्नॉलॉजी संस्थाही मेटाव्हर्स कसे काम करेल याबाबत काम करत आहे. मेटाव्हर्स बँकीगचे जे डेमो तयार करण्यात आले होते, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी आणि हिंदी भाषेतील बँक कर्मचाऱ्यांचे अवतार ग्राहकांशी बोलताना आणि व्यवहारात मदत करताना या डेमोत दिसले. हा एक नवाच अनुभव होता, असे मेटाव्हर्स तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या इझिओफाय कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी नूर फातिमा यांनी म्हटले. बँक व्यवहारांच्या सुरक्षेसाठी आम्ही व्हाइस बायमेट्रीक पद्धतीचा अवलंब करण्याचा विचार करत आहोत, त्याची माहिती बँकांचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) यांना दाखवत आहोत, असेही त्या म्हणाल्या. 

ह्युमन होलोग्राम (Human hologram)

इझिओफाय कंपनीने व्हर्च्युअल बँकेची सफर कशी असेल याचा डेमो तयार केला आहे. यामध्ये ह्युमन होलोग्रामचा वापर करण्यावर काम सुरू आहे. मानवी होलोग्राम म्हणजे एखाद्या व्यक्तीची आभासी प्रतिमा कशी दिसेल, कशी बोलेल, चालेल, यावर काम सुरू आहे. तसेच बँकेच्या रिसेप्शन काऊंटवर सलवार कमीज घातलेली महिला कर्मचारी ग्राहकांचे स्वागत करेल, अशी थीम डेमोमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

मेटाव्हर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा

बँकींग क्षेत्रात मेटाव्हर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी यामध्ये अनेक आव्हाने आहेत. जसे की प्रत्येक बँकिंग व्यवहारासाठी मेटाव्हर्स वापरणे कितपत शक्य आहे, हे आताच सांगता येत नाही. कारण बँकेचे व्यवहार करताना सॉफ्टवेअरमध्ये बॅच प्रोसेस हा पर्याय सद्यस्थितीत वापरला जातो. पूर्णत: AI द्वारे व्यवहार होण्यामध्ये भाषेचे, तंत्रज्ञानाचे आणि सुरक्षेचे अडथळे आहेत. त्यामुळे भविष्यात यावर जास्त काम होऊ शकते. सध्यातरी हे तंत्रज्ञान बाल्यावस्थेतच आहे. सोबतच भारतामध्ये विविध भाषा आहेत. प्रत्येक स्थानिक भाषेचा बँक व्यवहारांमध्ये वापर करणे ही एक आव्हानात्मक बाब आहे.