2000 रुपयांची नोट बंद झाली. आता जास्त भार 500 रुपयांवर येणार आहे. त्यामुळे त्याविषयीच्या अफवादेखील (Rumors) प्रचंड पाहायला मिळत आहेत. अलिकडेच आरबीआय गव्हर्नरांच्या स्वाक्षरीवरून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल (Message viral on social media) होत आहे. त्यानंतर पीआयबीनं (Press information bureau) फॅक्ट चेक केलं. 500 रुपयांची नोट घेऊ नका, असं तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. मात्र असं काही तुमच्या ऐकण्यात आलं तर सावधान व्हा. पीआयबीनं सावधानतेचा इशारा दिला आहे. नेमकं प्रकरण काय? पाहू...
पीआयबीनं जाणून घेतलं सत्य
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे, की 500 रुपयांची ती नोट घेऊ नका, ज्यामध्ये हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरांच्या स्वाक्षरीजवळ नसून गांधीजींच्या फोटोजवळ आहे. आता हा मेसेज व्हायरल झाल्यानं सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पीआयबीनं एकूणच हा विषय गंभीरतेनं घेतला आणि यामागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पीआयबीचं फॅक्ट चेक
पीआयबीनं या प्रकरणी फॅक्ट चेक केल्यानंतर या मेसेजची सत्यता समजली, तेव्हा हा खुलासा अतिशय धक्कादायक होता. पीआयबी फॅक्ट चेक केलं त्यानंतर हा संदेश पूर्णपणे बनावट असल्याचं म्हटलं आहे. आरबीआय आणि पीआयबीनं स्पष्ट सांगितलं आहे, की असं काहीही नाही. दोन्ही प्रकारच्या नोटा या वैध आहेत. अफवा पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावं. कोणताही संभ्रम बाळगू नये, असं आवाहन या निमित्तानं पीआयपीनं केलं आहे.
दावा: ₹500 का वह नोट नहीं लेना चाहिए जिसमें हरी पट्टी आरबीआई गवर्नर के सिग्नेचर के पास न होकर गांधीजी की तस्वीर के पास होती है।#PIBFactCheck:
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 24, 2023
✔️यह दावा #फ़र्ज़ी है।
✔️@RBI के अनुसार दोनों ही तरह के नोट मान्य होते हैं।
अधिक जानकारी के लिए यहाँ जाएं: https://t.co/DuRgmRJxiN pic.twitter.com/T8q3m2fv8w
2000च्या नोटांसंबंधीही पसरल्या होत्या अफवा
आता 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या असल्या तरी जेव्हा त्या चलनात होत्या तेव्हाही मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जात होत्या. 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एटीएममधून या नोटा मिळत नाहीत. आरबीआयनं त्याचं प्रिंटिंग बंद केल्यानं आता केवळ 100, 200 आणि 500 रुपयांच्याच नोटा मिळतील, असा मेसेज मागे व्हायरल झाला होता. त्यावेळीही पीआयबीनं फॅक्ट चेक करून असे मेसेज बनावट असल्याचं सांगितलं होतं. आता 500 रुपयांच्या मेसेजवरूनही लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर पीआयबीनं स्पष्टीकरण दिलं आहे.