Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Construction world record: चहावाल्याच्या मुलाने चक्क 8415 स्के. फुटाचे 105 दिवसाचे बांधकाम 43 दिवसात केले पूर्ण

Construction world record

Image Source : www.google.com

Construction world record: मयूर जैनच्या याच कौशल्याची नोंद चक्क वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये(Construction world record in india) घेण्यात आली आहे.

Construction world record: ही गोष्ट आहे नाशिकमध्ये राहणाऱ्या मयूर जैनची(Mayur Jain). मयूर पेशाने सिव्हिल इंजिनिअर(Civil Engineer) आहे. त्याचे वडील मुकेश जैन हे एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करत होते. घरची बेताची परिस्थिती असतानाही या पट्ट्याने मोठ्या कष्टाने सिव्हिल इंजिनिअर तसेच चार्टर्ड इंजिनीयरिंगचे(Chartered Engineer) शिक्षण पूर्ण केले. सध्या तो चर्चेत आहे ते त्याच्या अत्याधुनिक बांधकाम कौशल्यामुळे. कसं, चला जाणून घेऊयात.

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये घेतली दखल(World Record of India)

नाशिकचा युवा सिव्हील इंजिनीयर(Young Civil Engineer ) मयुर जैनने एका कंपनीचे 8415 स्क्वेअर फुटाचे बांधकाम हाती घेतले होते. हे बांधकाम करण्यासाठी  105 दिवसांचा कालावधी लागणार होता मात्र या पट्ट्याने हे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर(Use of advanced technology) करून अवघ्या 43 दिवसात पूर्ण केले. त्याच्या याच कौशल्याची नोंद चक्क वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये(Construction world record in india) घेण्यात आली आहे. याबद्दल त्याला विचारलं असता त्याने सांगितलं आहे की, मोबाईल ॲपद्वारे रियल टाइमिंगमध्ये काँक्रीटची खरी ताकद समजते. हे काम व्यवस्थित व लवकर पूर्ण व्हावे यासाठी विशेष सेंटरिंग डिझाईन(Special centering design) करण्यात आले आहे. बांधकामाला लवकर ताकद मिळावी यासाठी विशेष केमिकलचा उपयोगही त्याने बांधकाम करताना केला आहे. या कामासाठी 50 कामगार दिवस रात्र झटत होते आणि हे त्यांचेच श्रेय आहे, असं त्याचं म्हणणं आहे. विशेष कौतुकाची गोष्ट  म्हणजे 43 दिवस संपल्यानंतर स्लॅब उघडण्याचे काम फक्त 7 दिवसाच्या आत करण्यात आले, साधारणपणे या कामासाठी 25 दिवस लागतात. त्याच्या याच कामगिरीमुळे सगळीकडे त्याचे कौतुक केले जात आहे.

प्रॉमिसिंग इंजिनियर अवॉर्ड 2022 ने सन्मानित(Promising Engineer Award 2022)

यापूर्वी त्याने विश्व प्रसिद्ध मांगीतुंगी तीर्थक्षेत्र येथे सात मजली 100 रूमची धर्मशाळा, सर्वतोभ्रद महल आणि संत निवास इत्यादी कामे त्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहेत. काही महिन्यापूर्वीच मांगीतुंगी येथे झालेल्या महामस्तक अभिषेक सोहळ्यात फक्त 10 दिवसात 1800 स्क्वेअर फुटचे बांधकामासह 12 फूट उंच भगवंताची वेदी तयार करण्यात आली होती. ज्यावर 40 टनाची भगवंतांची प्रतिमा उभी केली आहे. त्यांच्या या कार्याला बघून 2022 चा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयरने नाशिक चॅप्टरचा प्रॉमिसिंग इंजिनियर अवॉर्ड(Promising Engineer Award 2022) त्याला देऊन गौरवले होते.