Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Max Life चा ‘स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्युशन’ प्लॅन म्हणजे सुरक्षा आणि गुंतवणुकीचा अनोखा संगम!

Smart Flexi Protect Solution Plan

Max Life Insurance Plan : मॅक्स लाईफ इन्श्युरन्सने पगारदार/नोकदार व्यक्तींसाठी, कामगारांसाठी आणि विशेषत: स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी ‘स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्युशन’चा (Smart Flexi Protect solution) पर्याय आणला आहे. याद्वारे अपंगत्व आणि गंभीर आजारापासून संरक्षण मिळवण्याबरोबरच संपत्ती निर्माण करता येणार आहे.

मॅक्स लाईफ इन्श्युरन्स (Max Life Insurance) कंपनीने स्पेशल थ्री-इन-वन स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्युशन प्लॅन आणला आहे. या प्लॅनमधून ग्राहकांना लाईफ कव्हरसह आरोग्यविषयक सुरक्षा आणि यात गुंतवणूक केलेल्या रकमेवर मार्केटनुसार रिटर्नही मिळणार आहे. मॅक्स लाईफ फ्लेक्झी वेल्थ प्लस आणि मॅक्स लाईफ क्रिटिकल इलनेस अॅण्ड डिसॅबिलिटी सिक्युअर रायडर यांच्यावतीने 'स्मार्ट फ्लेक्झी प्रोटेक्ट सोल्युशन (Smart Flexi Protect solution)' योजना बाजारात आणली आहे.

मॅक्स लाईफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत त्रिपाठी (Prashant Tripathy, MD and CEO of Max Life) यांनी या नवीन योजनेबद्दल सांगताना म्हटले की, मॅक्स लाईफचा नवीन प्लॅन Smart Flexi Protect solution हा खासकरून पगारदार/नोकरदार व्यक्तींसाठी आणि लहान-मोठा उद्योग करणाऱ्या व्यक्तींसाठी बाजारात आणला आहे. 

मॅक्स लाईफ इन्श्युरन्स कंपनीने Smart Flexi Protect Solution हा नवीन कॉम्बिनेशन प्लॅन आणला आहे.

फ्लेक्सी वेल्थ प्लस (Flexi Wealth Plus)

फ्लेक्सी वेल्थ प्लस प्लॅनमधून मॅक्स लाईफ कंपनी आर्थिक संरक्षणाबरोबरच लाईफ कव्हर आणि या प्लॅनमध्ये गुंतवलेल्या रकमेवर शेअरमार्केटनुसार परतावाही मिळणार आहे. या प्लॅनद्वारे कंपनी ग्राहकांसाठी गुंतवणुकीच्या 5 वेगवेगळ्या योजना आणि 11 फंड घेऊन आली. ज्याद्वारे गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीनंतर चांगला परतावाही मिळण्याची शक्यता आहे.

मॅक्स लाईफ क्रिटिकल इलनेस ॲण्ड डिसॅबिलिटी सिक्युर रायडर

हा प्लॅन ग्राहकांसाठी आर्थिक मदतनीस म्हणून काम करतो. या प्लॅनमध्ये 64 गंभीर आजार आणि कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या व्यक्तीचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी विशिष्ट कव्हरेज मिळवून देते.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये 

Smart Flexi Protect Solution Max Life Insurance

डेथ बेनिफिट (Death Benefit)

मॅक्स लाईफच्या स्मार्ट फ्लेक्सी प्रोटेक्ट सोल्यूशन या योजनेमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनींना/कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक संरक्षणासाठी अतिरिक्त स्तर देण्यात आला.

हेल्थ कव्हर (Health Cover)

मॅक्स लाईफच्या क्रिटिकल इलनेस अॅण्ड डिसॅबिलिटी सिक्युअर रायडरमुळे विमाधारकाला 64 प्रकारचे गंभीर आजार आणि एकूण कायमचे अपंगत्व आल्यास त्यापासून आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

गुंतवणूक (Investment)

या प्लॅनद्वारे विमाधारकाला शेअर मार्केटमधून मिळणाऱ्या परताव्याद्वारे गुंतवणुकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होऊ शकते.

सुलभ प्रक्रिया (Easy Process)

कंपनीने ग्राहकांना इन्श्युरन्स प्लॅन घेण्याची प्रक्रिया खूपच सुलभ ठेवली. ग्राहकांना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे वैद्यकीय तपासणी करण्याची सुविधा दिली. तसेच दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली.

टॅक्समध्ये सवलत (Tax Benefit)

इन्कम टॅक्स कायद्यातील तरतुदीनुसार विमाधारकाला नियमानुसार टॅक्समध्ये सवलत मिळू शकते.

कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 चे प्रसिद्ध केलेल्या वार्षिक लेखापरीक्षणाच्या कागदपत्रांनुसार मॅक्स लाईफ इन्श्युरन्स कंपनीने 22,414 कोटी रुपयांचा प्रीमियम मिळाला आहे. 31 मार्च 2022 पर्यंत, कंपनीकडे 1.08 ट्रिलियन रुपये एयूएम (Assets Under Management) होती.