मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टोयोटा (Toyota) भारतीय बाजारपेठेत अधिक मजबूत हायब्रिड कार (Maruti Suzuki Hybrid Car) सादर करण्याचा विचार करत आहेत. मारुती सुझुकी ग्रँड विटारा मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनसह ऑफर करत आहे, तर टोयोटा हायब्रीड पॉवरट्रेनसह हायराइडर आणि इनोव्हा हायक्रॉस ऑफर करत आहे. एमएसआयएल (MSIL) पुढील आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी 3 नवीन मजबूत हायब्रिड कार लॉन्च करण्याते प्लॅनिंह करत आहेत.
नवीन स्विफ्ट आणि डिझायर
पुढील पिढीसाठी असलेल्या स्विफ्ट आणि डिझायरवर मारूती सुझुकीचे काम सुरु आहे. या कार पुढील आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किंवा मार्च 2024 पर्यंत लॉन्च केल्या जाण्याची शक्यता आहे. नवीन सुझुकी स्विफ्टची परदेशातील बाजारपेठांमध्ये चाचणी सुरू झाली आहे. नवीन मॉडेलमध्ये स्टाइलिंग, फीचर्स आणि पॉवरट्रेनच्या बाबतीत मोठे बदल दिसणार आहेत. नवीन मॉडेलला एक मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान मिळणार आहे. हे तंत्रज्ञान नवीन ग्रँड विटारावर ऑफर केल्याप्रमाणेच असणार आहे. या कारमध्ये टोयोटाच्या मजबूत हायब्रीड तंत्रज्ञानाच्या जोडीने 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह नवीन-जनरेशन स्विफ्ट आणि डिझायरची ऑफर देण्यात येईल. रिपोर्टनुसार, नवीन स्विफ्ट ट्विन्स या देशातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार ठरतील. हे नवीन मॉडेल जवळपास 35-40kmpl मायलेज देईल अशी अपेक्षा आहे. स्विफ्ट आणि डिझायरच्या नवीन हायब्रीड आवृत्त्या देखील आगामी CAFE II नियमांची पूर्तता करतील. मॅन्युअल आणि एएमटीसह 1.2L ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह ऑफर दिलेली असेल.
इनोव्हा हायक्रॉस आधारित एमपीव्ही
टोयोटा-सुझुकी दरम्यान चालू असलेल्या मॉडेल-शेअरिंग भागीदारीचा एक भाग म्हणून, टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला मारुती सुझुकीसोबत शेअर करेल. एमपीव्हीला आपल्या स्वतःच्या नेमप्लेटखाली बाजारात आणण्यापूर्वी इंडो-जपानी ब्रँड त्यात काही बदल सादर करणार आहे. नेक्सा डीलरशिपद्वारे विकल्या जाणार्या, नवीन इनोव्हा हायक्रॉस आधारित मारुती एमपीव्ही हे ब्रँडचे देशातील सर्वात महाग मॉडेल असेल. नवीन 3-रो एमपीव्ही टोयोटाच्या TNGA-C मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. यामध्ये फ्रंट-व्हील-ड्राइव्ह लेआउट असेल. नवीन मॉडेल मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनसह सादर केले जाईल. हे टोयोटाच्या मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह 2.0L पेट्रोल इंजिनद्वारे सपोर्टेड असेल. या कारमध्ये पॉवर आणि टॉर्क 186PS आणि 206Nm टॉर्क आहे. ते ई-सीव्हीटी स्वयंचलित युनिटशी जोडलेले आहे. 21.1kmpl चे प्रभावी मायलेज देण्याचा दावा करण्यात येत आहे. या कार्सच्या पेट्रोल व्हर्जनला 174PS/205Nm, CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 2.0L NA पेट्रोल इंजिन मिळणार आहे.
News Source : - अब होगी बंपर बचत, मारुति सुजुकी लॉन्च कर रही 3 सस्ती स्ट्रॉन्ग हाइब्रिड कारें – News18 हिंदी
3 Upcoming Maruti Cars With Efficient Hybrid Powertrain (indiacarnews.com)