Maruti Suzuki Car Booking: मारुती सुझुकीच्या गाड्यांची भारतीयांमध्ये भलतीच क्रेझ आहे. भारतात कार विक्रीमध्ये मारुती सुझुकीचा जवळपास 50% हिस्सा आहे. स्वीफ्ट, बलेनो, एर्टिगा, ग्रँड वितारा यांसह अनेक मॉडेल्सला ग्राहकांची पसंती आहे. मारुती सुझुकीच्या गाड्यांची अॅडव्हान्स बुकींग चार लाखांच्याही पुढे गेली आहे. मागणीनुसार गाड्यांचा पुरवठा कमी होत असल्याने वेटिंग पिरियडही वाढत आहे. जिम्मी आणि फ्राँक्स या गाड्या नुकत्याच कंपनीने नोयडा येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केल्या. या गाड्यांसाठी बुकिंग वाढली आहे. बुकिंग जास्त झाल्याने कारची डिलिव्हरी मिळण्यास उशीर होऊ शकते.
मारुती सुझुकीच्या गाड्यांची बुकिंग आणि इन्क्वारयरी वाढली(Maruti Suzuki car Booking)
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये बुकिंगचा आकडा 3 लाख 63 हजार एवढा होता. यापैकी जवळपास 1 लाख 20 हजार बुकिंग नव्याने लाँच झालेल्या गाड्यांसाठी होती. "सद्य स्थितीत 4,05,000 एवढी गाड्यांची बुकिंग आधीच झालेली आहे. गाड्यांची बुकिंग आणि चौकशी मोठ्या प्रमाणात होत असून ही चांगली गोष्ट आहे, असे मारुती सुझुकी इंडियाचे मार्केंट आणि सेल्स विभागाचे अधिकारी शशांक श्रीवास्तव म्हणाले.
Jimny आणि Fronx गाड्यांच्या बुकिंमध्ये वाढ
जानेवारी 2022 शी तुलना करता यावर्षी जानेवारी महिन्यात बुकिंगचे प्रमाण 16 टक्क्यांनी वाढले असून गाड्यांच्या चौकशीचे प्रमाण 28% वाढले आहे. Jimny आणि Fronx या नव्याने लाँच झालेल्या गाड्यांमुळेही बुकिंगचे वाढली आहे. जीम्मी आणि फ्राँक्स या गाड्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: जीम्मी गाडीला जास्त प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला 1 हजार Jimmy गाड्या बुक होत आहेत. आतापर्यंत जिम्मी गाडीसाठी 11 हजार बुकिंग पूर्ण झाल्या आहेत, असे श्रीवास्तव म्हणाले.
सेमिकंडक्टरच्या तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम(semiconductor shortage for Cars)
फ्राँक्स गाडीच्या दिवसाला 300 बुकिंग येत आहेत. या गाडीच्या आतापर्यंत 4 हजार बुकिंग झाल्या आहेत. या दोन्ही गाड्यांची किंमत अद्याप मारुतीने निश्चित केली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत या दोन्ही गाड्या हीट होतील. सेमिकंडक्टरचा पुरवठा सुरळीत झाल्याने वाहन निर्मितीवर त्याचा परिणाम होणार नाही. बुकिंगचा आकडाही त्यामुळे खाली येईल, असे श्रीवास्तव म्हणाले.
ऑक्टोबर डिसेंबरदरम्यान सेमिकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहननिर्मितीला फटका बसला होता. या काळात 46 हजार गाड्या निर्मितीवर परिणाम झाला. 2022 साली मारुती सुझुकीने भारतात 15.76 लाख कार विकल्या. त्याआधी म्हणजे 2021 साली 13.64 लाख कार विकल्या होत्या. 2021 च्या तुलनेत मागील वर्षी मारुतीची कारविक्री तब्बल 16 टक्क्यांनी वाढली होती.