Maruti Suzuki Grand Vitara: आघाडीची वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने सुरक्षेसंबंधीत त्रुटीमुळे 11 हजार 177 Grand Vitara कार माघारी बोलवल्या आहेत. मागील आठवड्यात कंपनीने आपल्या विविध मॉडेल्सच्या 17 हजारांपेक्षा जास्त गाड्या माघारी बोलावल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्यांदा कंपनीने कार माघारी बोलावल्या आहेत. सीट बेल्ट मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला.
काय आहे सीटबेल्टमध्ये त्रुटी? (Defect in seat belt function)
11 हजार 177 Grand Vitara गाड्या माघारी बोलवत असल्याचे कंपनीने आज जाहीर केले. या गाड्यांमध्ये पुढील आसनासाठी बसवण्यात आलेल्या सीट बेल्टमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे. सीट बेल्ट लावण्यासाठी असलेल्या माऊंटिंग ब्रॅकेटमध्ये त्रुटी आहे. दिर्घ काळाच्या वापरामुळे हे ब्रॅकेट ढिले पडू शकते. त्यामुळे चालकाची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता होती. अपघाताच्या वेळी सीटबेल्ट निघण्याची शक्यताही होती. ही चूक लक्षात आल्यानंतर कंपनीने ग्रँड वितारा गाड्या माघारी बोलावल्या आहेत.
याआधीही कार माघारी बोलावल्या होत्या (Maruti Suzuki recalls cars)
मागील आठवड्यात मारुती सुझुकी कंपनीने 17 हजार 362 गाड्या माघारी बोलावल्या होत्या. Alto K10, S-Presso, Eeco, Brezza, Baleno and Grand Vitara models कंपनीने सुरक्षेतील त्रुटी असल्यामुळे माघारी बोलावल्या होत्या. एअर बॅगच्या कामात अडथळा निर्माण झाल्याने गाड्या माघारी बोलवण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता.
काही दिवसांपूर्वी कंपनीने ग्रँड वितारा (Grand Vitara) या गाडीचे सीएनजी मॉडेल बाजारात लाँच केले आहे. याआधी कंपनीने पेट्रोल आणि हायब्रीड ही दोन मॉडेल्सही लाँच केली आहेत. गँड वितारा या सीएनजी SUV ची किंमत 12 लाख 85 हजार रुपयांपासून पुढे आहे. या गाडीची डेल्टा आणि झेटा ही दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत. मारुती सुझुकी वितारा सीएनजी या गाडीची स्पर्धा टोयोटा हायरायडर सीएनजी या गाडीशी असून टोयोटाची ही गाडी लवकरच लाँच होणार आहे.