भारतात स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल अर्थातल SUV बाजारपेठ सतत विस्तारत आहे. आणि विक्री बरोबरच या क्षेत्रातली स्पर्धाही वाढतेय. कोरोना नंतरच्या काळात आता मारुती सुझुकी, ह्युंदेई, महिंद्रा या कंपन्यांना SUV बाजारपेठ काबीज करण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी नवनवीन मॉडेल बाजारात आणण्याबरोबरच विक्रीसाठी आक्रमक रणनिती आखण्याचे कंपन्यांचे प्रयत्न आहेत. मारुती सुझुकीने गेल्यावर्षी या सेगमेंट जिमनी आणि फ्राँक्स ही दोन मॉडेल बाजारात आणली.
आणि आता या मॉडेलच्या विक्रीतून SUV सेगमेंटमधली भारतातली कंपनीची हिस्सेदारी त्यांना वाढवायची आहे.
आपली विक्री दुप्पट करुन, 25 टक्के मार्केट शेअरसह नेतृत्व मिळवण्याचं उद्दिष्टं कंपनीने ठेवलं आहे. ऑटो प्रमुख कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 13 टक्के मार्केट शेअरसह 2.02 लाख स्पोर्टस युटिलिटी वाहने (SUV) विकली. या चालू आर्थिक वर्षात सुमारे पाच लाख युनिट्सची विक्री करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
SUV चा मर्केट मध्ये दबदबा कायम
स्पोर्टस युटिलिटी वाहने विकणाऱ्या क्षेत्राने देशाअंतर्गत प्रवासी वाहन उद्योगात सर्वात वेगाने मार्केट काबीज केले आहे. एकुण प्रवासी वाहन बाजारपेठेतील SUV चे योगदान 2018 मध्ये 24 टक्के वरुन वर्ष 2022 मध्ये 43 टक्के पर्यंत वाढले आहे. मारुती सुझुकी इंडियाचे विक्री आणि विपणन क्षेत्राचे वरिष्ठ कार्येकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, यावर्षी एसयूव्हीची बाजारपेठ सुमारे 19 लाख युनिट्स असणे अपेक्षित आहे, ब्रेझा एंट्री एसयूव्ही सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे,तर कंपनीला ग्रँड विटाराच्या विक्रीतही या वर्षी वाढ होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय जिमनी आणि फ्रॉन्क्स या दोन नवीन SUV मॉडेल्सची भर देखील कंपनीला या आर्थिक वर्षात अतिरिक्त पैसा आणण्यास मदत करेल.
कंपनीला वाढवावा लागेल शेअर्सचा हिस्सा
मारुती सुझुकी कंपनीला दोन मॉडेलसाठी जवळपास 41,000 बुकींग आधीच मिळाले आहेत, जे पुढील काही माहिन्यात बाजारात लाँच होणार आहे. तसेच पूढील काही महिन्यांमध्ये या कंपनीचा बाजारातील हिस्सा (Share Market Growth) वाढत असल्याचेही शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले.
नॉन -SUV सेगमेंटमध्ये कंपनीचा बाजार हिस्सा सुमारे 65 टक्के इतका होता. परंतु SUV क्षेत्रामध्ये कंपनीने पहिजे तेवढी स्पिड न पकडल्याने शेअर मधील एकुण हिस्सा 45 टक्कयांच्या खाली गेला आहे. आणि जर का कंपनीला ते 50 टक्के पर्यंत वाढवायचे असेल तर, कंपनीला SUV स्पेस मध्ये शेअर्सचा हिस्सा वाढवावा लागेल, आणि मारुती सुझुकी कंपनी हेच करण्याचा प्रयत्न करीत आहे.
वाहन उद्योगाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो
अवकाळी पाऊस, वाहन कर्जावरील वाढीव व्याजदर आणि नवीन नियामक नियमांमुळे (New Regulatory Rules) वाढलेला इनपुट खर्च यामुळे चालू आर्थिक वर्षात वाहन उद्योगाला सावध राहण्याची गरज आहे. विशेषत: अवकाळी पावसाचा ग्रामीण भागातील मागणीवर परिणाम होतो. वाहन विक्रेत्यांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या (एफएडीए) म्हणण्यानुसार वाहन उद्योगाची वाढ कमी कमी होणार आहे. वाहन उद्योगाने 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण किरकोळ विक्रीत 21 टक्क्यांनी दुहेरी अंकी वाढ नोंदवली आहे.