Maruti Suzuki CNG Vehicle: भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुतीने Fronx चे CNG प्रकार सादर केले आहे. यासह मारुतीच्या सीएनजी वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एका वाहनाची भर पडली आहे. मारुती सिग्मा आणि डेल्टा प्रकारांमध्ये S-CNG पर्याय ऑफर करीत आहे. मारुती फ्रॉन्क्स एस-सीएनजीच्या सिग्मा प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 8,41,500 रुपये असु शकते. त्याच वेळी, डेल्टा वेरिएंटची एक्स-शोरूमची किंमत 9,27,500 रुपये असेल.
मायलेज किती?
मारुती फ्रॉन्क्स सीएनजी व्हेरिएंट प्रगत 1.2L K-Series DualJet, Dual VVT इंजिनसह येईल, जे एका किलोग्रॅममध्ये 28.51 किलोमीटरचे मायलेज देईल. फ्रँक्सचा CNG प्रकार 6000 rpm वर 57 kW ची कमाल उर्जा आणि 4300 rpm वर 98.5 Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्याची क्षमता ठेवतो. कंपनीचा दावा आहे की, मारुती फ्रॉन्क्स एस-सीएनजी 28.51 किमी/किलो इतका मजबूत मायलेज देण्यास सक्षम असेल.
FRONX S-CNG 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायासह सिग्मा आणि डेल्टा या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. फ्रँक्सच्या S-CNG प्रकारात तुम्हाला अनेक उत्कृष्ट रंग पर्याय (Colors Option) मिळतील.
वैशिष्ट्ये काय?
मारुती कंपनीने मारुती फ्रँक्स सीएनजी लाँच केले आहे आणि देशातील शाश्वत मोबिलिटी सोल्यूशन्सच्या दिशेने आपले एक पाऊल पूढे टाकले आहे. मारुती फ्रँक्सच्या एस-सीएनजी प्रकारात ड्युअल एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टमसह इतर वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल.
ग्राहकांनी दर्शविला विश्वास
मारुती FRONX S-CNG सादर करताना, मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणाले की, यावर्षी ऑटो एक्स्पोमध्ये लाँच झाल्यापासून, FRONX ला त्याच्या स्पोर्टी डिझाइन, प्रगत पॉवरट्रेन आणि प्रीमियममुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
2010 मध्ये मारुतीने पहिले सीएनजी फिट केलेले मॉडेल लाँच केले. तेव्हापासून मारुतीने देशात 14 लाख S-CNG वाहनांची विक्री केली आहे. ही आकडेवारी कंपनीच्या तंत्रज्ञानावर ग्राहकांचा विश्वास दर्शवते. मारुती FRONX S-CNG कंपनीच्या एकूण विक्रीत S-CNG कारचा वाटा वाढवेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. FRONX S-CNG लाँच केल्यानंतर, कंपनीचा CNG मॉडेल्सचा पोर्टफोलिओ 15 वाहनांपर्यंत वाढला आहे.