Market Closing Bell: सकाळच्या सत्रात भांडवली बाजारातील मरगळ दुपारनंतर निघून गेली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 74.61 अंकांनी वाढून 60,130.71 वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 28 अंकांनी वाढून 17,769.25 वर स्थिरावला. आज कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्याचे दर किंचित वाढले तर चांदीचे दर खाली आले. बँक निफ्टी निर्देशांकात 42 अंकांची वाढ झाली. सार्वजनिक बँकांचे भावही वाढले.
कोणते शेअर्स वर कोणते शेअर्स खाली
निफ्टी निर्देशांकातील अदानी एंटरप्राइजेस, बजाज फायनान्स, ब्रिटानिया, बजाज फेनसर्व, भारती एअरटेल या कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर एचडीएफसी लाइफ, युपीएल, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स खाली आले.
52 आठवड्यांत सर्वात खाली आलेले शेअर्स कोणते?
Art Nirman , बीईएमएल लँड अॅसेट, क्रॉम्पटन ग्रेव्हिस कन्झ्युमर इलेक्ट्रिक, इंडिया ग्लायकोल्स, आयपीसीए लॅबोरेटरीज, पीव्हीआर, रोबस्ट हॉटेल्स आणि Udayshivakumar Infra या कंपन्यांचे शेअर्स मागील 52 आठवड्यांत तळाला आले. तर बजाज ऑटो, पावर मेक, अनुपम रसायन, गोदरेज कन्झ्युमर, ग्लेनमार्क फार्मा, किर्लोस्कर ऑइल इंजिन, आयटीसी, एजीस लॉजिस्टिक, हिल्टन मेटल फोर्जिंग या कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचले.
सौजन्य - गुगल
महिंद्रा हॉलिडेजने तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत तीनपट जास्त नफा कमावला. हॉलिडे सिझन आणि कडक उन्हामुळे रिसॉर्ट आणि हॉटेल्सला मोठी मागणी आहे. कर वजा करुन कंपनीने 56 कोटी रुपये नफा कमावला. कंपनीच्या हॉटेल व्यवसायाने 31 टक्क्यांची वाढ नोंदवली.
चालू आठवड्यात मोठ्या घडामोडींची शक्यता?
भारतीय भांडवली बाजार मागील काही दिवसांपासून प्रगती करत आहे. खूप मोठी पडझड झाली नाही. मात्र, चालू आठवड्यात बाजारात हालचाल होऊ शकते. कारण, या आठवड्यात अमेरिकेतील विकासदर (GDP) आणि महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. तसेच अमेरिकेतील बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्या तिमाही निकाल जाहीर करतील. जर ही आकडेवारी नकारात्मक आली तर त्याचा परिणाम भारतीय भांडवली बाजारावर होऊ शकतो. पुढील महिन्यात युएस फेडरल व्याजदर वाढ करणार की नाही? यावरही मार्केट अवलंबून आहे. भारतीय शेअर मार्केटमध्ये प्रगती दिसून येत असली तर पुढील काही दिवसात मोठ्या घडामोडी होऊ शकतात.