शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment) करताना प्रत्येकालाच टेन्शन येत असते. आपल्या कमाईचा पैसा अशा मार्केटमध्ये लावायचा, जिथे प्रॉफिट किंवा लॉसचे (Profit & Loss) 50-50 टक्के चान्सेस आहेत, टेन्शन कोणाला नाही येणार? स्वतःचे पैसे गुंतवणूक करताना जर एवढा घाम फुटत असेल तर लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये गुंतवताना म्युच्युअल फंडमधील फंड मॅनेजर्सची काय अवस्था होत असेल याचा विचार न केलेलाच बरा. मोठ्या संख्येने लोकांचे पैसे गुंतवणे आणि त्यातून त्यांना फायदा देखील मिळवून देणे. हे वाटते तितके सोपे नाही.
मार्केटमध्ये आतापर्यंत अनेक उत्तम फंड मॅनेजर्स (Top Fund Managers) होऊन गेलेत व आज ही आहेत; जे गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्स मिळवून देत आहेत. अशाच फंड मॅनेजर्सपैकी एक होते जॉन नेफ (John Neff). अमेरिकेतील या मॅनेजरने 19व्या शतकात एका लहानशा फंडची 5 हजार टक्क्यांनी वाढ करून दाखवली होती. त्यांच्या या विशेष इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीमुळे (Investment Pholosofy) त्यांचे नाव संपूर्ण मार्केटमध्ये सन्मानाने घेतले जाते. चला तर आजच्या मार्केट बुल्स (Market Bulls)मध्ये आपण जाणून घेऊयात कोण आहेत; हे फंड मॅनेजर्सचे हिरो जॉन नेफ.
जॉन नेफ यांचे सुरुवातीचे आयुष्य (John Neff Earlier Life)
जॉन नेफ यांचा जन्म 1931 मध्ये वाउसेन ओहायो (Wauseon, Ohio) इथे झाला होता. त्यांनी टोलेडो विद्यापीठातून (University of Toledo) शिक्षण घेत 1955 मध्ये सुमा कम लॉड (summa cum laude) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी क्लीव्हलॅण्डच्या (Cleveland) नॅशनल सिटी बँकेत (National City Bank) काम केले व 1958 मध्ये केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या (Case Western Reserve University) बिझनेस स्कूल मधून पदवी प्राप्त केली.
जॉन नेफ यांचे इन्व्हेस्टमेंट करिअर (Investment Career of John Neff)
जॉन नेफ यांनी 1964 मध्ये वेलिंग्टन मॅनेजमेंट (Wellington Management Company) कंपनीपासून सुरूवात केली. ते व्हॅन्गार्ड ग्रुप ऑफ फंड्सचे (Vanguard group of funds) उप-सल्लागार म्हणून कार्यरत होते. या कंपनीत तीन वर्षे राहिल्यानंतर त्यांची विंडसर (Windsor), जेमिनी (Gemini) आणि क्व्यालीफाईड डिविडेंड फंडसचे (Qualified Dividend Funds) पोर्टफोलिओ मॅनेजर (Portfolio Manager) म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ते 1995 मध्ये निवृत्त झाले. व्हॅन्गार्ड ग्रुप ऑफ फंड्समध्ये काम करत असताना त्यांच्या योगदानामुळे या फंडने 5,546 टक्क्यांचा क्युम्युलेटीव्ह रिटर्न (Cumulative return) दिला होता.
नेफ एक व्हॅल्यू इन्व्हेस्टर (Value Investor) होते. ज्यांना कमी किंमत-ते-कमाई (Price-to-Earning P/E) पद्धतीचा वापर करून चांगले स्टॉक खरेदी करण्यावर विश्वास होता. ते कंपनीवर व कंपनीच्या कारण्यापद्धतीवर बारीक लक्ष देत असत. त्यांच्या मते कंपनी निवडताना स्ट्रॅटेजी वापरण्यापेक्षा कंपनीचा चहुबाजूने अभ्यास करणे फायद्याचे ठरू शकते. रिटर्न ऑन इक्विटी (Return On Equity - ROE) हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे टूल होते. ज्यामुळे कंपनीचे व्यवस्थापन किती प्रभावी आहे; याचा सर्वोत्तम अंदाज बांधने शक्य होते. पण नेफ आणि इतर व्हॅल्यू इन्वेस्टर्समध्ये थोडा फरक नक्कीच होता. नेफ इतर व्हॅल्यू इन्वेस्टर्सप्रमाणे डिविडेंड देणाऱ्या कंपन्यांकडे दुर्लक्ष न करता आवर्जून त्यामध्ये इन्व्हेस्ट करत असत.
जॉन नेफ यांची इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी (Investment Philosophy of John Neff)
नेफ त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी आणि वेळेवर अचूक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 1973-74च्या संकटकाळात जे गुंतवणूकदार ज्या शेअर्सकडे ढुंकून देखील पाहत नव्हते. अशा शेअर्समध्ये नेफ यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांचा याता इन्व्हेस्टमेंट करण्याचा हा निर्णय पुढे त्या फंडला भरपूर फायदा देणारा ठरला. त्यांच्या या फिलॉसॉफीबद्दल सांगताना, नेहमी सांगत असत की, "जे लोकप्रिय नाही ते करणे नेहमीच सोपे नसते, पण तिथेच तुम्ही तुमचे पैसे कमावता."
1971 मध्ये एका मुलाखतीमध्ये नेफ सांगत होते की, त्यांनी त्यांच्या पर्सनल पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमधील जवळजवळ 50 टक्के इनव्हेस्टमेन्ट ही इक्विटी (Equity)ऐवजी फिक्स्ड इनकम अॅसेटमध्ये (Fixed Income Asset) केलेली आहे. त्यावेळी त्यांचे वय साधारण 19-20च्या आसपास होते. तरीही त्यांनी त्यावेळी तो निर्णय घेतला. पण त्यांच्या मते, तरुण गुंतवणूकदारांनी आपल्या इन्कममधील 70 ते 80 टक्के रक्कम इक्विटीमध्येच इन्व्हेस्ट करावी. तेही कमी P/E रेशो असणाऱ्या चांगल्या कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट करावेत. ते नेहमी डिव्हर्सिफिकेशन म्हणजेच विविधीकरणाच्या विरोधात होते.
ते नेहमी म्हणत असत की, "माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी शेअर बाजाराशी वाद घातला आहे. विंडसरचे यश शेवटी गर्दीच्या मिठीतून बाहेर पडण्याच्या आणि लाजिरवाण्या होण्याच्या जोखमीला सामोरे जाण्याच्या आमच्या इच्छेतून आले. लोकांना न पटणाऱ्या मार्गांचा वापर करूनच मी पैसे कमवले आहेत."