Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

असे कमवा घरबसल्या पैसे! | Earn Money From Home

असे कमवा घरबसल्या पैसे! | Earn Money From Home

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काही कुटुंबातील कमावत्या व्यक्ती गेल्या. त्यामुळे कधी घराबाहेरही न पडणाऱ्यांवर कुटुंबाची जबाबदारी आली. अशावेळी इंटरनेटद्वारे आणि घरी राहून विविध प्रकारची कामे करून पैसे कमवण्याचा नवीन पर्याय खुला झाला आहे.

सध्या बाजारात घरबसल्या काम करून पैसे मिळवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्हाला कोणत्या कामात रस आहे आणि तुम्ही किती काळ हे काम करू शकता, यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यानुसारच तुम्हाला कामाची निवड करावी लागेल. अनेक कंपन्या आता घरातून काम करण्याची सोय देत आहेत. यासाठी शिक्षण आणि थोड्या प्रशिक्षणाची गरज आहे. उदाहरणार्थ तुम्हाला मराठी किंवा इंग्रजीमधून टायपिंग येत असेल तर तुम्ही घरातून डेटा एन्ट्रीची कामे सहज करू शकता. गुगलद्वारे तुम्ही तुमच्या आवडीची अशी कामे शोधू शकता. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला घरातून काम करणं आता शक्य आहे. घरबसल्या काम करण्याच्या आणखी काही संधी आपण पाहुयात.

रिसेलिंग अ‍ॅप 

घरबसल्या किंवा आपली कमाई वाढविण्यासाठी सध्या रिसेलिंग अ‍ॅप हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये शून्य गुंतवणूक आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर तुम्ही पैसे कमवू शकता. रिसेलिंग करण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट असणे आवश्यक आहे. आपल्या स्मार्टफोनमध्ये रिसेलिंग अ‍ॅप डाउनलोड करून आपला संपर्क क्रमांक आणि जुजबी माहिती भरून तुम्ही त्या ऍपचे रिसेलर होता. त्यानंतर त्यातील उत्पादने उदाहरणार्थ, कपडे, सौंदर्यप्रसाधने, गृहोपयोगी वस्तू तुमच्या सोशल मीडियावर स्वतःचे मार्जिन लावून शेअर करता येतात. तसेच तुम्हाला ऑर्डर मिळाल्यानंतर 7 ते 15 दिवसांत तुमच्या बँक खात्यात मार्जिनचे पैसे जमा होतात. रिसेलरचे काम करण्यासाठी तुम्हाला बराचसा वेळ सोशल मीडियावर घालवणे गरजेचे आहे. यातून तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकता. तसेच तुम्हाला नवनवीन कल्पना मिळू शकतील. रिसेलिंगचे काम विद्यार्थी, गृहिणी, पेन्शनधारक किंवा नोकरी करणारे सुद्धा रू शकतात.

सोशल मीडिया

युट्यूब (YouTube), इंस्टाग्राम (Instagram), फेसबुकचा (Facebook) वापर करूनही आपण घरबसल्या पैसे कमवू शकतो. सोशल मीडियासाठी आपल्याकडे नवीन कल्पना आणि चांगला आशय असणे गरजेचे आहे. युट्यूब आणि इंस्टाग्रामवर तुमचे जेवढे अधिक फॉलोवर्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून चांगले पैसे मिळू शकतात.

उत्पादने तयार करणे

काही लघु उद्योग हे आपल्या व्यवसायाला अधिक गती यावी यासाठी बाहेरून कामे करून घेतात. यातील बहुतांश कामे ही घरात राहून करता येणारी असतात. कंपनीकडून छोटेसे मशीन व सामग्री देऊन ही कामे करून घेतली जातात. यासाठी चांगला मोबदला दिला जातो. यामध्ये अगरबत्ती, मेणबत्ती, पत्रावळ्या, द्रोण तयार करणे, कागदाचे बॉक्स बनवणे, अशी कामे असतात. कंपनीकडून मशीन हाताळण्याचे, पॅकिंगचे प्रशिक्षण दिले जाते.

टिफिन सर्व्हिस

जर तुम्हाला उत्तम स्वयंपाक येत असेल तर तुम्ही टिफीन सर्व्हिस सुरु करू शकता. कामानिमित्त अनेक तरुण-तरुणी बॅचलर म्हणून एकाच घरात राहत असतात. अशा लोकांना घरगुती जेवण आणि टिफिनची गरज असते. आपल्या सोसायट्यांमध्ये किंवा आजूबाजुच्या परिसरात छोटी जाहिरात करून तुम्ही टिफीनच्या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकता.

हॉबी क्लासेस

जर तुमच्याकडे एखादी विशिष्ट वस्तू किंवा शोभेच्या वस्तू बनविण्याची कला असेल, तर त्यातून तुम्ही पुरेसे पैसे मिळवू शकता. तुमच्या आवडीच्या छंदातून तयार केलेल्या वस्तू तुम्ही विकू शकता त्याचबरोबर त्या वस्तू बनवण्याचे हॉबी क्लासेस ही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला घराबाहेर पडायची आवश्यकता नाही. तुम्ही ऑनलाईन क्लासेसही घेऊ शकता.

अशाप्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही विविध प्रकारची कामे घरातून करू शकता. यामुळे तुमचा प्रवास खर्च आणि वेळ वाचू शकतो.